Home /News /pune /

पुण्याचं कोरोना हॉटस्पॉट हे चित्र आता बदलणार, प्रशासन लागलं कामाला

पुण्याचं कोरोना हॉटस्पॉट हे चित्र आता बदलणार, प्रशासन लागलं कामाला

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घट कायम असून बुधवारी शहरातल्या Active रुग्णांची संख्या ही 8 हजारांवर आली आहे.

पुणे 21 ऑक्टोबर: कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातून आता दिलासा देणाऱ्या बातम्या येत आहेत. सलग काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख घसरणीला लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला असून शहराची कोरोना हॉटस्पॉट अशी निर्माण झालेली प्रतिमा पुसण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. सलग 20 दिवसांपासून नव्या रुग्णांची आणि मृत्यूची संख्याही घटत आहे. त्यामुळे अशाच उपाययोजना कायम ठेवत परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी आणखी नव्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घट कायम असून बुधवारी शहरातल्या Active रुग्णांची संख्या ही 8 हजारांवर आली आहे. बुधवारी दिवसभरात 428 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली.तर  दिवसभरात 758 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. तर काही महिन्यांपूर्वी वादग्रस्त ठरलेल्या जम्बो कोविड सेंटरमधून आता दिलासा देणारी माहिती पुढे आली आहे. विविध प्रकारचे रुग्ण जम्बो कोविड सेंटरमधून बरे होऊन घरी परतत आहेत. नुकतेच एका 91 वर्षीय व्यक्तीने करोनाच्या संसर्गावर मात करीत या व्हायरसवर विजय मिळविला. नारायण रामचंद्र शेलार असे या करोना योद्ध्याचे नाव आहे. शेलार यांनी तब्बल 25 दिवस जम्बो कोविड सेंटरमध्ये करोनाविरुद्ध झुंज दिली. त्यांना करोना विषाणूच्या संसर्गामुळे खोकला व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दम लागत होता. त्यामुळे त्यांना जम्बो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांनी करोनावर विजय मिळवलाच आणि आज बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हे आजोबा व्यवस्थित बरे होऊन घरी जात असल्याबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबीयांसह जम्बो सेंटरमधील करोना योद्ध्यांनीही आनंद व्यक्त केला. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या यवतच्या संगीता पांढरे या गंभीर अवस्थेतील 55 वर्षीय करोनाबाधित महिला पेशंटने तब्बल 31 दिवस करोनाविरुद्ध लढा देत करोनावर विजय मिळवला होता. आठ दिवस व्हेंटिलेटरवर असूनही इच्छाशक्ती व येथील सर्व करोना योद्धे यांच्या प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी करोनावर मात केली. पुन्हा वाढले कोरोना रुग्ण; या क्षेत्रात आता संक्रमण रोखण्यासाठी कर्फ्यू डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी व विचारपूस करण्यात येत होती. तसेच, कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधता येत होता, असे सांगून शेलार यांनी जम्बोतील सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी जम्बो कोविड सेंटरमधील सर्व करोना योद्धे आणि प्रशासनाला मनोमन धन्यवाद दिले. आधी झालेल्या सर्व चुकांपासून धडा घेत जम्बोबाबत आता जास्त काळजी प्रशासन घेत आहे. “सर्व प्रकारच्या रुग्णांची जम्बोमध्ये अत्यंत काळजीपूर्वक देखभाल केली जाते. प्रत्येक रुग्ण येथून ठणठणीत बरा होऊन घरी जावा यासाठी करोना योद्धे प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळून ते बरे होत आहेत हे दिलासादायक चित्र आहे,” असे जम्बो कोविड सेंटरच्या कार्यकारी अध्यक्ष व अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या