Home /News /pune /

Corona 3rd wave: कोरोनापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी पुणे प्रशासन सज्ज; अशी केली पूर्वतयारी

Corona 3rd wave: कोरोनापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी पुणे प्रशासन सज्ज; अशी केली पूर्वतयारी

Coronavirus third wave: कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता पुणे प्रशासनाने कोरोनाचा सामना करण्यासाठी पूर्व तयारी केली आहे.

पुणे, 22 मे: राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत असतानाच आता ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत तिसरी लाट (Coronavirus third wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता प्रशासनाकडून पूर्व तयारी करण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येईल आणि त्याचा फटका मुलांना बसेल असं भाकीत तज्ज्ञांनी केलंय. लाटेमध्ये लहान मुलांना याचा फटका बसणार यानतंर राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) तयारी सुरू केली असून पुण्यात लहान मुलांचे कोविड सेंटर (Childrens covid care center) येरवडा येथे सज्ज ठेवण्यात आलं आहे. पुणे महापालिका आणि सेंट्रल फाँर युथ डेव्हलपमेंट अँड अँक्टीव्हीटीच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर निर्माण आले आहे. शिवसेनेचे नगरसेवक अविनाश साळवे यांनी पुढाकार घेतला आहे. 40 बेडचे हे चाईल्ड कोविड सेंटर असणार आहे. यामध्ये लहान मुलांच्या सोबत पालकांचीही राहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लहान मुलांना भिती वाटू नये याकरता विशेष सजावट भिंतीवर करण्यात आली असुन खेळण्याकरता विविध खेळणी इथ ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांसाठी चांगली बातमी, 96 टक्के रुग्णांमध्ये वर्षभरानंतरही पुरेशा अँटिबॉडी लहान मुलांना आवडणारे मोटू-पतलू, छोटा भीमचे कार्टुन्सही भिंतीवर लावण्यात आल्याने इथे आल्यानतंर लहान मुलांकरता आनंददायी वातावरण राहील भीती कमी होईल अशी योजना करण्यात आलीय. त्याचसोबत त्यांना 2 वेळचे जेवण, नाष्टा, दूध, तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस, अँब्युलन्स या सुविधा याठिकाणी चोवीस तास उपलब्ध असणार आहेत. याचसोबत 180 बेड्स हे ज्येष्ठ नागरिकांकरता तयार करण्यात आले असून आँक्सिजनची सुविधाही देण्यात आली आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स मार्गदर्शन करणार लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांनी सहभाग करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. रविवारी म्हणजेच 23 मे रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी सोशल मीडियात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Pune

पुढील बातम्या