Home /News /pune /

पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचं निधन, काही दिवसांपूर्वी झाली होती बदली

पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचं निधन, काही दिवसांपूर्वी झाली होती बदली

पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड (वय 48) यांचं गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.

    पुणे, 7 मे: पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड (वय 48) यांचं गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. पुण्यातील राहत्या घरीच साहेबराव गायकवाड यांची प्राणज्योत मालवली. अतिशय मनमिळावू अधिकारी म्हणून महसूल विभागात ते परिचित होते. एक कार्यक्षम व उमदा सहकारी गमावल्याने महसुली कर्मचार्‍यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. साहेबराव गायकवाड हे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी होते. रिधोरे येथे (ता. माढा, जि. सोलापूर) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एका मुलगा असा परिवार आहे. हेही वाचा.....तर कोरोना रुग्ण आणखी वाढतील, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर असं का म्हणाले राज ठाकरे? काही दिवसांपूर्वी झाली होती बदली.. साहेबराव गायकवाड यांची काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली होता. मात्र, या बदली विरोधात त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. नंतर त्यांची बदलीला स्थगिती मिळाली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला होता. या दलीच्या घोळामुळे ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते, असं बोललं जात आहे. निधनाची चौकशी व्हावी... दरम्यान, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याच्या बातमीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका त्यांच्या बदली संदर्भात झालेल्या राजकारणामुळे आल्याचे बोललं जातं आहे. याच्यात किती खरं किती खोटं हे नंतर ठरेल. परंतु या प्रकरणात नेमकं काय घडलं असावं, याचा मात्र राज्य शासनाने तपास करायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे. हेही वाचा..जून, जुलै असणार सर्वात जास्त धोकादायक! एम्सच्या संचालकांनी केला मोठा खुलासा निर्माण झाले हे प्रश्न..? - 30 एप्रिल रोजी गायकवाड यांची बदली करण्यात आली. 30 एप्रिल म्हणजे कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाचा काळातील अत्यंत जिकिरीचा काळ. असं असताना या काळात त्यांची बदली अचानक करण्याचे काय कारण होते? -साहेबराव गायकवाड यांची बदली फार वर्षांपासून प्रलंबित होती काय? - अगदी अलीकडे म्हणजे सहा महिन्यापूर्वी त्यांची पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती झाली होती. त्यामुळे त्यांची बदली लगेच करण्यामध्ये काय संयुक्तिक कारण होते? -साहेबराव गायकवाड यांच्या बदलीला सिव्हिल सर्विसेस बोर्डाची मान्यता घेतली होती का?आणि सिविल सर्विसेस बोर्डाने मान्यता दिली असेल तर ती कशाच्या आधारावर दिली? - कोणकोणत्या नियमांचं पालन केलं गेलं ? आणि कोणते नियम डावलले गेले ? आणि ते का डावलले गेले? याची चौकशी झाली पाहिजे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Pune news

    पुढील बातम्या