चंद्रभागेचा 'अभंग' इंद्रायणीत विसावला.. सोपान महाराजांवर आळंदीत अंत्यसंस्कार

चंद्रभागेचा 'अभंग' इंद्रायणीत विसावला.. सोपान महाराजांवर आळंदीत अंत्यसंस्कार

पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या पायी पालखी सोहळ्यात ब्रेक फेल झालेला जेसीबी घुसल्याने अनेक वारकरी, वाहने चिरडली गेली.

  • Share this:

वीरेंद्रसिंग उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,20 नोव्हेंबर: संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास यांच्या पार्थिवावर आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तर अतुल महाराज आळशी यांच्या पार्थिवावर खेड तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोपान महाराज नामदास यांच्या अकाली निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली आहे. अनेक मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, मंहत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीस सोपान महाराज नामदास यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी आळंदी, पंढरपुरसह संपूर्ण राज्यातून भाविक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी, सोपान महाराज नामदास यांचे पार्थिव विष्णू मंदिरात अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यविधी पूर्वी हरिनामाच्या गजरात मंदिर व ग्रामप्रदक्षिणा घालण्यात झाली. शोकाकूल वातावरणात भाविक व वारकरी संप्रदायाच्या उपस्थित हरिनाम जयघोषात त्यांचे अत्यंसंस्कार करण्यात आले. पंढरपूरमधील नामदेव मंदिरात काल (मंगळवार) संपूर्ण दिवस शुकशूकाट होता.

दिंडीत घुसला जेसीबी, वारकरी-वाहनांना चिरडले...

दरम्यान, पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या पायी पालखी सोहळ्यात ब्रेक फेल झालेला जेसीबी घुसल्याने अनेक वारकरी, वाहने चिरडली गेली. पुण्याजवळील दिवे घाटात मंगळवारी सकाळी सव्वा वाजेच्या नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर 24 जण जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास (वय-36) व अतुल महाराज आळशी (वय-24) यांचा समावेश आहे. या दोघांवर आळंदीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जखमींवर हडपसर येथील नोबेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेसीबीचा चालक निरंजनकुमार दास (वय-32, मूळ रा. बिहार) याला पोलिसांनी अटक केली आहे. भाजपने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे...

विष्णू सोपान हुलवळ (35), शुभम नंदकिशोर आवारे (23), दीपक अशोक लासुरे (19), गजानन संतोष मानकर (20), वैभव लक्ष्मण भराटे (28), अभय अमृत मोकमपल्ले (19), कीर्तिमान प्रकाश गिरजे (23), आकाश माणिकराव भट्टे (30), ज्ञानेश्वर निवृत्तीराव कदम (40), गोरोबा जागडे (35), विनोद लहासे (30), नामदेव पुंजा सगर (34), सोपान म्हाळस्कर (25), गजानन सुरेश मानकर (20), नामदेव सगर (34), सोपान नेमिनाथ मासळीकर (25), दीपक अशोक लासुरे (19).

दरवर्षी कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरहून आळंदीला वारी निघते. त्यानुसार 12 नोव्हेंबर रोजी पौर्णिमेला दुपारी संत नामदेव महाराज पालखी दिंडी पंढरपूहून आळंदीकडे मार्गस्थ झाली होती. दिंडी 20 नोव्हेंबरला आळंदीत दाखल होणे अपेक्षित होते. तेथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यात हे वारकरी सहभागी होत असतात. त्यानुसार मजल दरमजल करत सोमवारी रात्री ही दिंडी सासवडला आली होती. तिथेच वारकऱ्यांनी मुक्काम केला व मंगळवारी सकाळी पुढील प्रवासासाठी पालखी निघाली होती. राज्यभरातील सुमारे एक ते दीड हजार वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. पुण्याजवळील दिवे घाटात सकाळी नऊच्या सुमारास वारकरी आले होते. घाट सुरू होण्यापूर्वी घाटमाथ्यावर सर्वजण चहापानासाठी थांबले होते. तेथून काही अंतरावरच एक जेसीबी एका दुचाकीला धडक देऊन थांबला होता. या अपघाताची माहिती घेतली असता या जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याचे वारकऱ्यांना कळले होते. त्यामुळे दिंडी पुढे जाईपर्यंत जेसीबी घाटात उतारावर आणू नकोस, अशी विनंती वारकऱ्यांनी जेसीबीच्या चालकाला केली होती. मात्र, अर्धा तास थांबल्यानंतर चालकाने पुन्हा जेसीबी चालू केला व पुढे जाऊ लागला. घाटाचा उतार असल्यामुळे चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले आणि एका रिक्षाला धडक देत जेसीबी काही क्षणांतच वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. काही जण जेसीबीखाली चिरडले गेले. या अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले तर 24 जण जखमी झाले.

Published by: Sandip Parolekar
First published: November 20, 2019, 9:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading