पुणे, 14 ऑगस्ट : पिरंगुट - हिंजवडी मार्गावर भरे-अंबडवेट हद्दीतील भरे पुलाजवळ एका भयंकर आणि भीषण अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. एका भरधाव ट्रकच्या समोर रस्ता ओलांडून जात असलेला पादचारी अचानक आल्याने ट्रकचे नियंत्रण सुटले व ट्रकने त्या पादचाऱ्याला उडवले.
हे दृश्य बघताना बघणाऱ्याच्या अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही, इतकी ही भयंकर दृष्य आहेत. मात्र एवढ्या भीषण घटनेत तो पादचारी सुखरूप बचावला असल्याचं पाहायला मिळाले.
या भीषण अपघातात एवढा मोठा ट्रक जोरात अंगावर येऊनही थोडक्यात बचावलेल्या तो व्यक्त मरणाच्या दारातून पुन्हा माघारी आला अ्संच म्हणावं लागेल . वेळ आली होती पण काळ आला नव्हता याची प्रचिती या घटनेतून आली.
हा अपघात 5 ते 6 दिवसापूर्वी झालेला असून अपघातातील ती व्यक्ती कोण होती याचा मात्र तपास लागला नाही. त्यामुळे भरधाव रस्त्यावरून जाताना सर्वांनीच नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे, असं आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.