Home /News /pune /

Pune Accident CCTV: दुभाजक तोडून ट्रकची अनेक गाड्यांना धडक, अंगावर काटा आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

Pune Accident CCTV: दुभाजक तोडून ट्रकची अनेक गाड्यांना धडक, अंगावर काटा आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

डिवायडर तोडून ट्रकची अनेक गाड्यांना धडक, अंगावर काटा आणणारा पुण्यातील अपघाताचा LIVE VIDEO

डिवायडर तोडून ट्रकची अनेक गाड्यांना धडक, अंगावर काटा आणणारा पुण्यातील अपघाताचा LIVE VIDEO

Pune accident caught in cctv: पुण्यातील दायरी परिसरात एक भीषण अपघात झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.

पुणे, 13 जानेवारी : पुण्यात अपघातांची मालिका (Accident in Pune) सुरूच असल्याचं दिसत आहे. आता पुण्यातील एका भीषण अपघाताचा व्हिडीओ (horrific accident video) समोर आला आहे. पुण्यातील धायरी परिसरात (Dhayari area of Pune) घडलेला हा अपघात तेथील सीसीटीव्हीत कैद ढाला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला आहे. भरधाव ट्रकने चक्क डिवायडर तोडून वाहनांना धडक दिली. (Major accident in Pune, horrific incident caught in CCTV) पुण्यातील धायरी परिसरात 11 जानेवारी रोजी हा अपघात घडला होता. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून त्यात दिसत आहे की, सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे रस्त्यावर वर्दळ होती आणि त्याच दरम्यान एक भरधाव ट्रक आला आणि त्याने डिवायडरला धडक दिली. या ट्रकचा वेग इतका होता की, डिवायडर तोडून ट्रकने रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला असलेल्या गाड्यांना धडक दिली. भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाहिये. मात्र, अपघाताचा हा सीसीटीव्ही पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो. दारुड्याने रिव्हरर्स गिअर टाकला अन् हातगाडीला उडवले पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. एका मद्यधुंद कारचालकाने रस्त्यावर असलेल्या गाडीला जोराची धडक दिली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुभाष वाघमारे असं या मद्यधुंद कारचालकाचे नाव आहे. सुदैवाने या अपघातात कुणाला दुखापत झाली नाही. पण, एक गरिब हातगाडीवाल्या तरुणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने हातगाडी चालक वेळीच बाजूला झाल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सुभाष वाघमारे याने मद्यधुंद अवस्थेत आपल्या मारुती सुझुकी अल्टो कारने घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याने रिव्हरर्स गिअर टाकला पण त्याला कशाचीच सुद नव्हती. त्याने एक्सलेटरवर पाय ठेवला आणि तशीच कार मागे आली. त्यामुळे भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या हातगाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या धडकेनं हातगाडी जागेवरून दूर फेकली गेली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Accident, Cctv footage, Pune

पुढील बातम्या