Home /News /pune /

पुणे परिसरात आत्महत्येची मालिका, कुटुंबानंतर आता आणखी एकाने घेतला जीवन संपवण्याचा निर्णय

पुणे परिसरात आत्महत्येची मालिका, कुटुंबानंतर आता आणखी एकाने घेतला जीवन संपवण्याचा निर्णय

पुणे शहरात आत्महत्येची आणखी एक घटना घडली आहे.

पुणे, 19 जून : मागील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतून आत्महत्येचा अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी आत्महत्या केली, तर पुण्यातील एकाच कुटुंबातील 4 जणांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुणे शहरात आत्महत्येची आणखी एक घटना घडली आहे. सिंहगडरस्ता परिसरातील धायरी येथे एका मंडप व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. 19 जून रोजी पहाटे दोन ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. स्वप्निल उत्तम रायकर( 45 वर्षे ) रा. शिव मल्हार नगर, रायकर मळा, धायरी, ता. हवेली जि. पुणे असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सिंहगडरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील यांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे. त्यांनी राहत्या घरी किचन रूम मध्ये छताच्या हुकला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मानसिक ताण तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुस्तम शेख हे करत आहेत. शहरात कुटुंबाची सामुहिक आत्महत्या एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार वाघजाईनगर इथे घडला. अतुल दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि दोन चिमुकल्यांसह राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Pune crime news, Pune news

पुढील बातम्या