Home /News /pune /

पुण्यातील चित्र बदलत असताना आणखी एक दिलासा, 91 वर्षीय आजोबांनी जिंकली करोनाविरुद्धची लढाई!

पुण्यातील चित्र बदलत असताना आणखी एक दिलासा, 91 वर्षीय आजोबांनी जिंकली करोनाविरुद्धची लढाई!

कोरोना हा आजार खोटा असल्याचे सांगणारा तरुण फिटनेस इफ्लूएसर रुपात चर्चित होता आणि फिटनेससे संबंधित व्हिडीओ शेअर करत होता. नुकताच तो तुर्कस्तानच्या ट्रिपला गेला होता.

कोरोना हा आजार खोटा असल्याचे सांगणारा तरुण फिटनेस इफ्लूएसर रुपात चर्चित होता आणि फिटनेससे संबंधित व्हिडीओ शेअर करत होता. नुकताच तो तुर्कस्तानच्या ट्रिपला गेला होता.

एका 91 वर्षीय व्यक्तीने कोरोनाच्या संसर्गावर मात करत या विषाणूवर विजय मिळविला.

पुणे, 21 ऑक्टोबर : विविध प्रकारचे रुग्ण जम्बो कोविड सेंटरमधून बरे होऊन घरी परतत आहेत. नुकतेच एका 91 वर्षीय व्यक्तीने कोरोनाच्या संसर्गावर मात करत या विषाणूवर विजय मिळविला. नारायण रामचंद्र शेलार असं या कोरोना योद्ध्याचे नाव आहे. नारायण शेलार यांनी तब्बल 25 दिवस जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोनाविरुद्ध झुंज दिली. त्यांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे खोकला व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दम लागत होता. त्यामुळे त्यांना जम्बो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांनी करोनावर विजय मिळवलाच आणि आज बुधवारी, 21 ऑक्टोबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हे आजोबा व्यवस्थित बरे होऊन घरी जात असल्याबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबीयांसह जम्बो सेंटरमधील कोरोना योद्ध्यांनीही आनंद व्यक्त केला. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या यवतच्या संगीता पांढरे या गंभीर अवस्थेतील 55 वर्षीय कोरोनाबाधित महिला पेशंटने तब्बल 31 दिवस कोरोनाविरुद्ध लढा देत कोरोनावर विजय मिळवला होता. आठ दिवस व्हेंटिलेटरवर असूनही इच्छाशक्ती व येथील सर्व करोना योद्धे यांच्या प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली. ‘जम्बो’मध्ये चांगली आरोग्य यंत्रणा असून, नाश्ता, जेवण, औषधे वेळेवर देण्यात येत होते. डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी व विचारपूस करण्यात येत होती. तसेच, कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधता येत होता, असे सांगून शेलार यांनी जम्बोतील सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी जम्बो कोविड सेंटरमधील सर्व कोरोना योद्धे आणि प्रशासनाला मनोमन धन्यवाद दिले. महपौर मुरलीधर मोहोळ व मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी जम्बोमधील आरोग्य सेवकांची प्रशंसा केली. “सर्व प्रकारच्या रुग्णांची जम्बोमध्ये अत्यंत काळजीपूर्वक देखभाल केली जाते. प्रत्येक रुग्ण येथून ठणठणीत बरा होऊन घरी जावा यासाठी कोरोना योद्धे प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळून ते बरे होत आहेत हे दिलासादायक चित्र आहे,” असे जम्बो कोविड सेंटरच्या कार्यकारी अध्यक्ष व अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितलं.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune news

पुढील बातम्या