पुणेकरांना खूशखबर, डेक्कन क्वीनसह 5 रेल्वे गाड्या 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार!

पुणेकरांना खूशखबर, डेक्कन क्वीनसह 5 रेल्वे गाड्या 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार!

गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वे सेवा आता पूर्वपदावर येत आहे. पुणेकरांची लाडाची असलेली डेक्कन क्वीन...

  • Share this:

पुणे, 07 ऑक्टोबर : गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वे सेवा आता पूर्वपदावर येत आहे. पुणेकर आणि मुंबईकरांची लाडाची असलेली डेक्कन क्वीन पुन्हा एकदा रुळावर धावणार आहे.  दोन दिवसांनी अर्थात 9 ऑक्टोबरपासून डेक्कन क्वीनसह पाच रेल्वे गाड्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे  गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे सेवा ठप्प होती. पण आता कोरोनाचा जोर ओसरत असल्यामुळे रस्ते वाहतुकीनंतर रेल्वे वाहतूक ही सुरू करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक, पाहा VIDEO

9 ऑक्टोबरपासून पुणे- मुंबई मार्गावरही रेल्वे गाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. एकूण 5 गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे.  त्यामुळे  पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेस आणि  मुंबई गोंदिया या विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे.

भाजपच्या नेत्याला विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक, सूनेनंच केली तक्रार

या पाचही रेल्वे गाड्यांचे आरक्षण उद्या 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे 6 महिन्याच्या लॉकडाउननंतर प्रवाशांची लाडकी 'दख्खनची राणी' रुळावर येणार आहे.  मात्र, संपूर्ण रेल्वे या आरक्षित असणार आहे. यामध्ये सामान्य बोगी (जनरल कोच) नाहीत. एवढंच नाहीतर पासधारकांना सुद्धा या रेल्वेनं प्रवास करता येणार नाही. फक्त ज्यांच्याकडे आरक्षित तिकीट आहे, त्यांनाच या रेल्वेनं प्रवास करता येणार आहे.

या पाच गाड्या धावणार

पुणे- मुंबई डेक्कन क्वीन

 मुंबई - पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस

 सोलापूर - मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस

 मुंबई - नागपूर दुरांतो एक्स्प्रेस

 मुंबई - गोंदिया एक्स्प्रेस

Published by: sachin Salve
First published: October 7, 2020, 4:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या