बदल्यांविरोधात पोलिसांमध्ये तीव्र असंतोष, पुणे आयुक्तालयात जमले 150 जवान

बदल्यांविरोधात पोलिसांमध्ये तीव्र असंतोष, पुणे आयुक्तालयात जमले 150 जवान

Pune Police: घरापासून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले पोलीस स्टेशनला बदल्या केल्याने आधीच दिवसातल्या सोळा तास काम करण्याचा दबाव आणि पुन्हा प्रवासासाठीचा त्रास कसा सहन करायचा असा या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे.

  • Share this:

पुणे 28 सप्टेंबर: कोरोना विरुद्ध पोलीस आघाडीवर लढत आहेत. काही हजार जणांना कोरोनाची लागणीही झाली आहे. अशा परिस्थितीत पुण्यात पोलिसांमध्ये सरकारच्या निर्णयाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. 400 पोलिसांच्या केलेल्या बदल्या या मनमानी पद्धतीने करण्यात आल्या आहेत असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तालयात 150 पेक्षा जास्त पोलीस एकत्र जमले असून आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागत आहेत. यात अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

साधारण बदली प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोईच्या होणाऱ्या तीन पोलीस स्टेशनचे संदर्भ मागितले जातात. मात्र यंदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये मोठा गोंधळ झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तीन पर्याया ऐवजी दुसरीकडेच कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याने जवळपास दीडशे पेक्षाजास्त कर्मचारी पोलीस आयुक्तालयात एकत्र जमलेत. घरापासून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले पोलीस स्टेशनला बदल्या केल्याने आधीच दिवसातल्या सोळा तास काम करण्याचा दबाव आणि पुन्हा प्रवासासाठीचा त्रास कसा सहन करायचा असा या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे.

...म्हणून 1राहुल तेवातियाला राजस्थाननं 3 कोटींना विकत घेतलं!

या पूर्वीचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशन यांच्या काळात या कर्मचाऱ्यांकडून बदल्यांसाठीचे अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठीची सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. नव्याने आलेले पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सहीने शनिवारी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आलेत. रविवारी सुट्टी असल्याने आज सोमवारी जवळपास दीडशे कर्मचारी हे पोलीस आयुक्तालयात या बदलांच्या विरोधामध्ये एकत्र जमले आहेत.

Unlock Maharashtra: रेस्टॉरंट उघडण्याविषयीचा निर्णय अद्याप नाहीच

ज्या कर्मचाऱ्यांना जिथे काम करण्याची इच्छा आहे तिथे त्यांना काम करू दिले जात नाही याउलट कर्मचाऱ्यांचा छळ करण्यासाठी या बदल्या केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.

कोरोनाच्या संकट काळात आधीच मनुष्यबळाची कमतरता असताना आणि पोलीसंवर मानसिक ताण असतांना या घटनांमुळे कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढणार असल्याचं या जवानांचं मत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 28, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या