• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुण्यातून तब्बल 35 किलो गांजा पकडला; 6 लाखांचा माल घेतला ताब्यात

पुण्यातून तब्बल 35 किलो गांजा पकडला; 6 लाखांचा माल घेतला ताब्यात

पोलिसांनी सापळा रचून गांजा (Ganja) वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक केलं आहे.

 • Share this:
  पुणे, 18 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील (Pune News) इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे पोलिसांनी सापळा रचून गांजा (Ganja) वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक केलं आहे. भिगवण पोलीसांनी तब्बल 35 किलो गांजा पकडला (Bhigwan police seized 35 kg of cannabis) आहे. त्याच्या ताब्यातून 6 लाख 16 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरूवारी 18 तारखेला रोजी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी डिकसळ या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. सुनील अनिल जाधव रा. सासवड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ( 35 kg of cannabis seized from Pune Goods worth Rs 6 lakh seized) पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख हे पुणे ग्रामीण यांनी अमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशानुसार भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक विनायक दडस यांच्या मार्गदर्शनात एक पथक नेमण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सुभाष रुपनवर, डी.पी जाधव, पोलीस अंमलदार दत्तु जाधव, रामदास जाधव, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, महेश बोरूडे, कल्पना वाबळे, होमगार्ड नितीन धुमाळ, पोलीस मित्र विशाल गुरगुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. हे ही वाचा-पुणे: 4 लाख वसूल करण्यासाठी तरुणाचं अपहरण; बेदम मारहाण करत 1 लाख लुटले भिगवण पोलिसांनी केलेल्या कारवाई 35 किलो वजनाचे अमली पदार्थ गांजा व एक होंडा शाइन असा एकूण सहा लाख 16 हजार 280 रुपये किमतीचा माल ताब्यात घेतला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: