पुणे जिल्ह्यात धोकादायक वळणावर बस पलटली; 18 जण जखमी, 2 ठार

पुणे जिल्ह्यात धोकादायक वळणावर बस पलटली; 18 जण जखमी, 2 ठार

या अपघातात तब्बल 18 जण जखमी झाले असून दोन ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

जुन्नर, 31 जानेवारी : पुणे (Pune) जिल्ह्यात नगर -कल्याण माहामार्गावर माळशेज घाटात एका धोकादायक वळणावर खाजगी बस पलटी होऊन भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. या अपघातात तब्बल 18 जण जखमी झाले असून दोन जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

सायंकाळी 8 च्या दरम्यान ही घटना घडली असून नगरहून कल्याणकडे जाणारी बस क्रमांक MH46 AH0109 पलटी झाली. अपघाताची बातमी समजताच परिसरातील सर्व रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना आळेफाटा व मुरबाड या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

अनेक दिवसांपासून माळशेज घाटात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहन चालकांना वाहन चालवणे जिकरीचे होत असून सदर अपघातही याच कारणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. मात्र अपघाताच्या कारणाबाबतची नेमकी आणि अधिकृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

हेही वाचा - गोवा बनावटीच्या दारूचा अवैध साठा, छापेमारीनंतर मोठी कारवाई

संत निरंकारी मिशनचे सदस्य तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात नेणं शक्य झालं आहे.

दरम्यान, या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अनेकजण जखमी असल्याने ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 31, 2021, 10:39 PM IST

ताज्या बातम्या