• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुणे : नांदेड सिटीतील 11 व्या मजल्यावरुन 17 वर्षीय श्रीयाची आत्महत्या; दहावीला 95 टक्क्यांनी झाली होती यशस्वी

पुणे : नांदेड सिटीतील 11 व्या मजल्यावरुन 17 वर्षीय श्रीयाची आत्महत्या; दहावीला 95 टक्क्यांनी झाली होती यशस्वी

श्रीया पुरंदरेच्या वडीलांची हॉर्स रायडींगची ॲकॅडमी आहे. त्यामध्ये बालपणीपासून श्रीया हॉर्स रायडींगचे धडे घेत होती

  • Share this:
पुणे, 1 ऑगस्ट : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध नांदेड सिटीमधून (Nanded City Suicide) एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. बारावीत शिकणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडर इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन एका मुलीने  आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथे घडली आहे. अद्याप आत्महत्येमागील कारण समोर आलेलं नाही. (Pune: 17-year-old Shriya commits suicide from 11th floor in Nanded City) दहावीला तब्बल 95 टक्के गुण मिळवून यशस्वी झालेल्या व सध्या बारावी इयत्तेत शिकत असलेल्या नॅशनल हॉर्स रायडर श्रीया गुणेश पुरंदरे (वय-17, रा. डी-103, मधुवंती, नांदेड सिटी, नांदेड, ता. हवेली) हिने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणारे अभिजीत देशमुख यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिले असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकणारी श्रीया पडली असल्याचे दिसून आले. अभिजीत देशमुख यांनी तातडीने ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. हे ही वाचा-आजीला सांगून स्नेहा किचनमध्ये गेली अन् परत आलीच नाही, देहूरोडमधील दुर्दैवी घटना श्रीया होती नॅशनल हॉर्स रायडर मिळालेल्या माहितीनुसार श्रीया ही अत्यंत गुणी मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते. श्रीयाच्या वडीलांची हॉर्स रायडींगची ॲकॅडमी आहे. त्यामध्ये बालपणीपासून श्रीया हॉर्स रायडींगचे धडे घेत होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर श्रीयाने हॉर्स रायडींगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. सर्व काही ठीक असताना श्रीयाने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published: