पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री...थायलंडच्या पाच तरुणींची सुटका

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री...थायलंडच्या पाच तरुणींची सुटका

पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या नांदेड सिटी जवळच्या मॉलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

पुणे, 21 ऑगस्ट-पुणे पोलिसांनी पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटनखाण्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी छापा टाकून पाच विदेशी मुलींची सुटका केली. खडकवासला धरणाजवळील नांदेड सिटीजवळ एका मॉलमधील स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून थायलंडच्या पाच तरुणींची सुटका केली आहे.

ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी मसाज सेंटर व्यवस्थापक अक्षय रामेश्वर ससेमल याला अटक करण्यात आली. त्याचा साथीदार कादर शेख याचा पोलीस शोध घेत आहेत. 'आर्चिड फाइड' स्पा मसाज सेंटरमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहित एलसीबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी बनावट ग्राहक स्पा सेंटरमध्ये पाठवले. तिथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या नांदेड सिटी जवळच्या मॉलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

अशी जाहिरात करून पुरवल्या जायच्या महिला...

दरम्यान गेल्या आठवड्यात मुंबईतील पवईत अशीच घटना समोर आली होती. सोशल मीडिया, वेबसाइटवर मोबाइल क्रमांक देऊन हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाची जाहिरात केली जात होती. या माध्यमातून हॉटेलमध्ये देहविक्रीसाठी महिला पुरवल्या जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष 7 च्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.या कामात पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार केला. त्याच्याकडून पवई येथील आरोपी एजंटला फोन करून हॉटेल रिलॅक्स इन रेसिडन्सी येथे पाठवले. ग्राहक हॉटेलच्या रूममध्ये पोहोचताच एजंटने तीन महिला रूममध्ये पाठवल्या. महिलांना ठरलेली रक्कम व कॅशिअरला रूमचे भाडे दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तीन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलच्या कॅशियरला अटक केली आहे. यातील आरोपी एजंट फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे

Loading...

दहिसर (डायघर) पिंपरीनाका परिसरातील एका बारवर डायघर पोलिसांनी रविवारी (18 ऑगस्ट) पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून 24 बारबालांसह 24 जणांना अटक केली. रॉयल गोल्ड बारमध्ये नियमांपेक्षा जास्त बारबाला लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत नृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे शहर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आदींच्या पथकाने बारवर छापा टाकला. या प्रकरणी 14 बारबाला आदी 24 जणांना अटक केली. यात बारमालक इंद्रमणी त्रिपाठी (42, रा. परेल, मुंबई), व्यवस्थापक सुरेश मोगवीरा (38, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यांचा समावेश आहे.

VIDEO: शंभर फेसबुक पोस्ट करून ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांची आत्महत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2019 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...