पुण्यात कचरा डेपोचे प्रश्न सुटणार कधी?

पुणे महानगरपालिकेचा कचरा हा उरुळी देवाची कचरा डेपोत डम्प केला जातो. गेल्या पाच दिवसांपासून कचरा डेपोला आग लागली असून ती धुमसत आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2017 06:41 PM IST

पुण्यात कचरा डेपोचे प्रश्न सुटणार कधी?

हलिमा कुरेशी,18 एप्रिल : पुणे महानगरपालिकेचा कचरा हा उरुळी देवाची कचरा डेपोत डम्प केला जातो. गेल्या पाच दिवसांपासून कचरा डेपोला आग लागली असून ती  धुमसत आहे. पालिकेकडून अग्निशामक दल पाणी आणि माती वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी यानंतर कचऱ्याचे ट्रक येऊ देणार नाही अशी भूमिका घेतलीय.

जानेवारी २०१५मध्ये अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक झाली त्यांनी ९ महिने वेळ मागितली होती मात्र अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. राष्ट्रीय हरित लवादात ही केस असून यावर अजून निर्णय येणं बाकी आहे. पुण्यात दररोज १७०० टन घनकचरा निघतो. मात्र त्यातील केवळ ५०० टन कचरा प्रक्रिया केला जातो. उरुळी देवाचाही -फुरसुंगी या गावात २५ वर्षांपासून हा कचरा टाकण्यात येतोय. सायंटिफिक लँडफिल  म्हणजेच शास्त्रीय पद्धतीनं भूभरण  होणं गरजेचं असताना ओपन डम्पिंग केली जाते.

पिंपरी सांडस गावात नवीन कचरा डेपो करणारअसं सांगितलं गेलं मात्र यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही. पुणे महानगर पालिकेचे कचराप्रक्रिया प्रकल्प  देखील अत्यावस्थेत आहेत.

हंजर प्रकल्प - १००० टन - दोन वर्षांपासून बंद

रोकेम  प्रकल्प - ७५० टन -प्रत्यक्षात ३०० टन कचरा प्रक्रिया होत

Loading...

दिशा - २०० टन

जागेवरच कचरा वर्गीकरण करून तो प्रभागात जिरवणं गरजेचं आहे. नवनियुक्त महापौरांनी लवकरच यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2017 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...