Home /News /pune /

पुण्यात खाजगी शाळेची दंडेलशाही; तक्रार घेऊन आलेल्या पालकांना बाऊन्सरकडून मारहाण, VIDEO व्हायरल

पुण्यात खाजगी शाळेची दंडेलशाही; तक्रार घेऊन आलेल्या पालकांना बाऊन्सरकडून मारहाण, VIDEO व्हायरल

Crime in Pune: पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एका खाजगी शाळेच्या काही बाऊन्सरने विद्यार्थ्यांच्या पालकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे, 12 मार्च: पुण्यातील (Pune) बिबवेवाडी परिसरातील एका खाजगी शाळेच्या काही बाऊन्सरने विद्यार्थ्यांच्या पालकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित पालक फी भरण्याबाबत आपली तक्रार घेऊन शाळेत आले होते. यावेळी शाळेतील खाजगी बाऊन्सरांनी त्यांना गेटवरून रोखून दमदाटी करत त्यांना मारहाण (Parents beaten by private school bouncer) केली आहे. याप्रकरणी संबंधित पालकांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल (FIR lodged) झाल्यानंतरही पोलिसांनी शाळेविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकार पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील क्लाइन मेमोरीयल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये (Kline memorial english medium school) घडला आहे. संबंधित शाळेतील काही विद्यार्थ्यांचे पालक विविध मागण्याबाबत निवेदन घेवून शाळेत गेले होते. यावेळी गेटवरील काही खाजगी बाऊन्सरनं त्यांच्यावर दादागिरी केली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना शिवीगीळ करत मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून यामध्ये खाजगी बाऊन्सर पालकांशी अरेरावी करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. हेही वाचा-पुण्यात विहिरीतील पाण्यासाठी पाडला रक्ताचा सडा, दोघांवर विळ्याने सपासप वार खरंतर, मागील काही काळापासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. दरम्यानच्या काळात राज्यातील अनेक शाळा बंद होत्या. तसेच कोरोना काळात पालकांच्या नोकऱ्या गेल्यानं आणि व्यवसाय ठप्प झाल्यानं अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अडचणींच्या काळात देखील अनेक खाजगी शाळांकडून पूर्ण फी भरण्याबाबत पालकांवर दबाब टाकला जात होता. अशात बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरीयल इंग्लिश मेडीयम स्कूलमधील प्रिन्सीपलने देखील फी भरण्याबाबतचं पत्र तक्रारदार पालकांना पाठवलं होतं. हेही वाचा-कोल्हापूर: 'बाबा, मुलाचा सांभाळ करा', म्हणत महिलेची नदीत उडी, मन हेलावणारी घटना या पत्राबाबत आपलं म्हणणं मांडण्यासाठी काही पालक शाळेत आले होते. याबाबत लेखी अर्ज देखील पालकांनी प्रिन्सीपलांना दिला होता. यावेळी पालकांनी प्रिन्सिपलकडे पोहोच पावती मागितली असता, प्रिन्सीपलने शाळेच्या खाजगी बाऊन्सर्संना बोलावून पालकांना बाहेर हाकललं आहे. यावेळी एका महिलेसह दोन पुरुष बाऊन्सर्संनी पालकांशी धक्काबुक्की, शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप शाळेविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Beating retreat, Crime news, Pune

पुढील बातम्या