पुण्यात विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, क्लासेसच्या संचालकाला धो-धो धुतले

पुण्यात विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, क्लासेसच्या संचालकाला धो-धो धुतले

विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना घडली

  • Share this:

वैभव सोनवणे(प्रतिनिधी)

पुणे,23 ऑक्टोबर: विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. विद्यार्थिंनींसोबत अश्लीस चाळे करणाऱ्या खासगी क्लासेसच्या संचालकाला संतप्त पालकांनी चांगलाच चोप दिल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिंहगड रोड परिसरात एका खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकाला पालकांनी चोप दिला. अभिरुची मॉल पोलिस स्टेशन समोर असलेल्या शिक्षा अकॅडमीमध्ये ही घटना घडली. पालकांनी आरोप केला की हा संचालक खासगी शिकवणीत समजावून सांगण्याच्या बहाण्याने मुलींना कथितरित्या मांडीवर बसवायचा आणि त्यांचे लैंगिक शोषण करायचा. त्यापैकीच काही मुलींनी आपल्या पालकांना तक्रार केली आणि पालकांनी थेट संचालकाच्या कार्यालयात धडकून त्याची धुलाई केली.

विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना पोलिस स्टेशनच्या अगदी समोर घडली. तरीही पोलिसांची याची खबर देखील नाही. पालकांनी पोलिसांवर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील केला आहे. व्हिडिओमध्ये प्रामुख्याने मारहाण करणारी महिला एक आई आहे. धुलाई सुरू असताना एका महिलेने आरोप लावत असल्याचा व्हिडिओ देखील असल्याचे सांगितले. यानंतर संचालकाने आपली चूक मान्य केली आणि माफी देखील मागितली.

अजित पवारांना पाठिंबा? बसपच्या उमेदवाराची काढली अर्धनग्न धिंड

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेससोबत गुप्तपणे हातमिळवणी करून अजित पवार यांना छुपा पाठिंबा दिल्याच्या रागातून बहुजन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बसपचे उमेदवार अशोक माने यांची मारहाण करत बारामतीत धिंड काढली. बारामतीच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आमराई भागातून सर्वांगाला काळे फासून अर्धनग्न धिंड काढून कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनाही शिव्यांची लाखोली वाहत मारहाण केली. काही अंतर धिंड काढल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या तावडीतून त्यांची सुटका केली. माने हे बारामतीमधून बसपचे उमेदवार होते. मतदान तारखेच्या आधी 7 दिवस मोबाइल फोन बंद करून ते अज्ञातवासात होते. सोमवारी मतदान झाल्यानंतर ते घरी असल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी त्यांना मारझोड करण्यास सुरुवात केली. नंतर अर्धनग्न करून अंगाला काळे फासून त्यांची धिंड काढली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

VIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 09:34 AM IST

ताज्या बातम्या