मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

कर्मचाऱ्यांचा संप असताना पुण्यातून खासगी बसेस सुटल्या STच्या दरात, प्रवाशांना दिलासा

कर्मचाऱ्यांचा संप असताना पुण्यातून खासगी बसेस सुटल्या STच्या दरात, प्रवाशांना दिलासा

गेल्या दोन दिवसांपासून प्रवासाकरिता प्रवाशांची होणारी ससेहेलपाट थांबल्याने दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून प्रवासाकरिता प्रवाशांची होणारी ससेहेलपाट थांबल्याने दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून प्रवासाकरिता प्रवाशांची होणारी ससेहेलपाट थांबल्याने दिलासा मिळाला आहे.

पुणे, 10 नोव्हेंबर : राज्यभरात असलेल्या एसटीच्या (ST Employee) 250 डेपोंमधून बुधवारी तब्बल 25 हजार खासगी गाड्या सोडण्यात आल्या. तर पुणे विभागातील (Pune News) एसटीच्या स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे स्टेशन, पिंपरीतील वल्लभनगर स्थानकांमधून 210 खासगी गाड्या धावल्या. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रवासाकरिता प्रवाशांची होणारी ससेहेलपाट थांबल्याने दिलासा मिळाला आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या काम बंद आंदोलनामुळे (ST Employee Protest) गेल्या तीन दिवसांपासून प्रवाशांचे हाल होत आहेत. हे लक्षात घेत शासनाने मंगळवारी रात्री एसटीच्या स्थानकांमधूनच खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या गाड्या एसटीच्याच भाडे दरात सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन पिंपरीतील वल्लभनगर स्थानकातून खासगी गाड्या सोडण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू असतानाच शासनाने एसटी स्थानकांतूनच ट्रॅव्हल्स चालकांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिल्यामुळे एसटी कर्मचारी नाराज झाले आहेत.

हे ही वाचा-आंदोलन करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात; महामंडळाकडून कारवाई सुरू

स्वारगेट एसटी स्थानक - 52 खासगी बस धावल्या

- शिवाजीनगर(वा.) - 33 खासगी बस धावल्या

- पुणे स्टेशन - 45 खासगी बस धावल्या

- पिंपरी-वल्लभनगर - 80 खासगी बस धावल्या

- पुण्यात एसटी स्थानकातून सुटलेल्या एकूण गाड्या - 210 खासगी बस

दरम्यान ST संताप सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर (ST Employee) एसटी महामंडळाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. राज्यभरात सुरू असलेलं एसटी कामगारांचं आंदोलन (Protest of ST employees) चिघळलं असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही ते आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे.

यादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यातही संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कडक कारवाईची एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे. निलंबनानंतर आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय करून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी गमवावी लागणार असं चित्र आहे.

First published:

Tags: Pune