देवेंद्र फडणवीसांनी फक्त जाहिरातबाजी केली, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीसांनी फक्त जाहिरातबाजी केली, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

गेले पाच वर्षे देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रावर राज्य केलं. या दरम्यान शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, बेरोजगार, भ्रष्टाचार वाढला.

  • Share this:

बारामती, 23 जानेवारी: गेले पाच वर्षे देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रावर राज्य केलं. या दरम्यान शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, बेरोजगार, भ्रष्टाचार वाढला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कोणताही मोठा प्रकल्प वाढवला नसून फक्त जाहिरातबाजी केली, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल केला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशात नागरिकता कायद्याअंतर्गत बदल करुन जो काही देशाच्या संविधानावर हल्ला चढवला जात आहे. याआधी नोटाबंदी करुन अर्थव्यवस्थेवर हल्ला चढवला होता. आता त्याच पद्धतीने NRC आणि CAA कायद्यांवरुन मोदींनी हल्ला केला आहे.

यामुळे देशात विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात विसंगती दिसून येत आहे. मोंदीनी संसदेत NRC कायद्याबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र दोन दिवसांतच अमित शहा यांनी नागरिकत्व कायद्याचे मसुदा सभागृहात मांडला आणि शहा यांनीच मोदींना खोटे पाडले. अमित शहा यांचं काँग्रेसमुक्त.. काँग्रेसमुक्त नसून विरोधीपक्ष मुक्त असं होत आहे. ज्यांच्या सहकारी संस्था आहेत त्यांना धमक्या दिल्या आणि आपल्याकडे वळवले. अर्थव्यवस्था अडचणीत आली असल्याचं खापर निर्मला सीताराम यांच्यावर फोडलं जात असून आंतरराष्ट्रीय सल्लागार यांचा सल्ला न घेतल्याने अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे मोदी सरकारचा निषेध करतो, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

अनेक वर्षे दिल्लीत असल्यामुळे अंदाज पत्रके पाहिली आहेत. अर्थमंत्र्यांचे बजेट सादर करण्याची पध्दत पाहिली आहे. मात्र प्रथमच या सर्व बैठका पंतप्रधान आणि अमित शहा यांनी स्वत: घेतल्या आहेत. एकूण 13 बैठका झाल्या मात्र या बैठकांना अर्थमंत्री निर्मला सीताराम यांना निमंत्रण देखील दिले नाही, हा अर्थमंत्रिपदाचा अपमान आहे. जर निर्मला सीताराम हे अर्थमंत्री चालणार नसतील तर त्यांना काढून टाका, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

First published: January 23, 2020, 7:17 PM IST

ताज्या बातम्या