पुणे, 28 सप्टेंबर: घटस्फोट घेतल्यानंतरही पतीकडून पुन्हा-पुन्हा लग्नासाठी प्रयत्न (divorced husband forced for remarriage)आणि प्रेमसंबंधानंतर प्रियकराकडून लग्नासाठी मानसिक छळ, दोघांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील एका महिलेनं आपल्या आयुष्याचा शेवट (Woman commits suicide) केला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.
सोहम राजू गागडे (रा. इचलकरंजी, कोल्हापूर) आणि गिरीश प्रवीण मछले (रा. बारामती) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहे. तर अपर्णा अभंगे असं आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे. संबंधित घटना 25 ऑगस्ट रोजी येरवडा परिसरातील कंजारभाटनगर येथे घडली आहे. याप्रकरणी मृत अपर्णा यांच्या आईनं पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून वर्गमित्राचं विकृत कृत्य; विवाहितेला किचनमध्ये डांबून ठेवलं अन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अपर्णा यांचा विवाह काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील इचलकरंजी येथील रहिवासी असणाऱ्या सोहम गागडे याच्याशी झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसांतच आरोपी सोहम पीडितेला त्रास देऊ लागला. अगदी छोट्या छोट्या कारणातून आरोपी तिला त्रास देऊ लागला. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं त्याच्याकडून घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर, बारामती येथील रहिवासी असणाऱ्या गिरीश मछले याच्यासोबत पीडित महिलेचे प्रेमसंबंध सुरू झाले.
हेही वाचा-'बायको लवकर घरी ये, भांडायला जायचंय', नकार दिल्याने चाकू भोकसून पत्नीला संपवलं
प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर, मृत अपर्णा आणि गिरीश दोघंही लग्न करणार होते. दरम्यान, घटस्फोट घेतलेल्या सोहमने पीडितेसोबत पुन्हा लग्न करण्यासाठी तगादा लावला. तर आरोपी प्रियकर गिरीशही लग्नासाठी पीडितेला मानसिक त्रास देऊ लागला. या दोघांच्या छळाला कंटाळून अपर्णा यांनी 25 ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात घटस्फोटित पती आणि प्रियकराविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Suicide