पुण्याचा गौरव,अग्निशमन दलाचे जवान राजाराम केदारींना राष्ट्रपती सेवा पदक

पुण्याचा गौरव,अग्निशमन दलाचे जवान राजाराम केदारींना राष्ट्रपती सेवा पदक

पुण्यातील अग्निशमन दलातील जवानांचा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • Share this:

पुणे, 27 जानेवारी : पुण्याच्या अग्निशमन दलातील अत्यंत निर्भीड आणि धाडसी अशी ओळख असलेल्या राजाराम केदार यांना अग्निशमन सेवेसाठी राष्ट्रपतींकडून दिला जाणारा गुणत्कृष्ट सेवा पदक देण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षात शहरात घडलेल्या अनेक आगीच्या घटना किंवा आपत्कालीन संकटांमध्ये राजाराम केदार यांनी बजावलेल्या धाडसी सेवे ची शहरात कायम चर्चा होत आली आहे.

मुंढव्यात इमारतीत लपून बसलेला बिबट्या पकडला असो किंवा सहकारनगरमध्ये कोसळलेल्या इमारतीतून अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं असो अशा एक ना अनेक घटनांमध्ये राजाराम केदार यांनी अत्यंत धाडसी काम करत सहभाग नोंदवला आहे. एका अग्निशमन दलाचे जवान आला मिळालेला हा सन्मान संपूर्ण शहरासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

Ration Card मध्ये अशाप्रकारे अपडेट करा मोबाईल नंबर आणि पत्ता; घरबसल्या होईल काम

आग,घरपडी, झाडपडी, बुडीत बाधित,पूर,महापूर,रस्ते अपघात आशा अनेक प्रकारचा नैसर्गिक कृत्रिम संकटांमध्ये नागरिकांची अत्यंत धाडसाने व जलद सुटका करून जिवितासह वित्ताचे संरक्षण करून अतुलनीय व धाडसी कामगिरी करणारे अग्निशमन कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत असतात. मात्र, इतर दलांच्या तुलनेमध्ये अग्निशमन दलाला तिथल्या जवानांनी दाखवलेल्या धाडसाला सरकारी पातळीवर ती फारस नावाजलं जात नाही. यंदाचं वर्ष मात्र त्याला अपवाद ठरले आहे. अग्निशमन दलाच्या राजाराम केदार यांना यंदाच्या वर्षीचा राष्ट्रपती सेवापदकाने सन्मानित करण्यात आल आहे.

अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचार प्रकरण, सुप्रीम कोर्टाची निर्णयाला स्थगिती!

पुण्यातील अग्निशमन दलातील जवानांचा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2019 मध्येही मुंढवा भागात सोसायटी मध्ये बिबट्या शिरला असता याच केदारी यांनी त्याला जिवंत पकडून वनविभागाला सुपुर्द करण्याच्या दलाच्या टीमचे नेतृत्व केलं होतं. तसंच तळजाई,धनकवडी भागात इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप रेस्क्यू ऑपरेशनचंही नेतृत्व  केदारी यांनी केलं होतं.

Published by: sachin Salve
First published: January 27, 2021, 5:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या