धक्कादायक: गरोदर महिलेवर बलात्कार करून खून? विवस्र अवस्थेत फेकला मृतदेह

धक्कादायक: गरोदर महिलेवर बलात्कार करून खून? विवस्र अवस्थेत फेकला मृतदेह

राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं असताना पुणे जिल्हा गरोदर महिलेच्या हत्येच्या घटनेने हादरला आहे.

  • Share this:

जुन्नर, 6 एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं असताना पुणे जिल्हा गरोदर महिलेच्या हत्येच्या घटनेने हादरला आहे. शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या गरोदर महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नंतर महिलेचा मृतदेह विवस्र अवस्थेत ऊसाच्या शेतात फेकण्यात आला आहे. महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जुन्नर तालुक्यातील कांदळी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

हेही वाचा..मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी! नाहीतर होईल न्यूयॉर्कसारखी स्थिती

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील उंबरकास शिवारात सोमवारी दुपारी ही घटना घडली. महिला शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी आली नाही. नंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला उसाच्या शेतात महिलेचा विवस्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.

महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता. महिलेवर बलात्कार करुन तिचा निर्घृण खून करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. नारायणगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

हेही वाचा..कोरोना मृत्यूमध्ये 60 टक्के लोक 61वर्षांच्या वरचे, डायबेटीस, ब्लडप्रेशर धोक्याचं

22 वर्षीय महिलेला तीन वर्षाची मुलगी असून ती गरोदर होती. मारेकऱ्यांनी तिची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

First published: April 7, 2020, 12:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading