शेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण महिन्याला कमावतो 3 लाख

आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा आणि पानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात आणि मधुमेहापासून बचाव होते. मधुमेहाच्या त्रासात शेवग्याच्या शेंगांच्या वापराने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात.

प्रमोद पानसरेंच्या घरात शेती हे उदर निर्वाहाचं साधन होतं. पण फूड टेक्नॉलॉजीमध्ये BTech केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून हा वेगळा व्यवसाय करायचं ठरवलं. शेवग्याचे आरोग्याला उपकारक गुण माहीत असल्यानेच हा उद्योग सुरू केल्याचं ते सांगतात.

  • Share this:
पुणे, 19 जून : मार्केटमधील मागणी, अभ्यास आणि दर्जेदार उत्पादनावर भर या त्रिसूत्रीनुसार काम करत पुण्यातल्या प्रमोद पानसरे (Pramod Pansare) यांनी फूड इंडस्ट्रीमध्ये (Food Industry) चांगली भरारी घेतली आहे. शेवग्याच्या पानापासून (Drumstick leaves chocolate) प्रथम पावडर नंतर चॉकलेट, स्नॅक्स यांसारखे पदार्थ तयार करून, त्यांची विक्री करून ते आता महिन्याला तीन लाख रुपयांचा व्यवसाय करत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने मागील काही वर्षांपासून शेवग्याला (Drumsticks) मागणी वाढत आहे. हे जाणून घेऊन प्रमोद पानसरे यांनी शेवग्याच्या पानांपासून चॉकलेट, चिक्की, खाकरा आणि स्नॅक्स तयार करण्याच्या उद्योग सुरू केला. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, 30 वर्षांचे प्रमोद एका सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. शेती हे त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन होते. 2012मध्ये त्यांनी फूड टेक्नोलॉजीमध्ये बी. टेक. केल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा स्वतः उद्योग सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. काही वर्षं त्यांनी खजुराचा व्यवसाय केला. परंतु, त्यात अपेक्षित फायदा न झाल्याने त्यांनी तो बंद केला; मात्र वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते एका फूड कंपनीत नोकरी करू लागले. तिथे तीन वर्षं काम करताना वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती प्रक्रिया त्यांनी जाणून घेतली. व्यवसायाला कशी झाली सुरुवात प्रमोद म्हणाले, शेवगा हा आरोग्यासाठी उपयुक्त असतो हे मला माहिती होतं; मात्र त्यावर प्रक्रिया करण्याची माहिती मला नोकरीत असताना मिळाली. त्यानुसार शेवग्याच्या शेंगा आणि पानांपासून मी पावडरनिर्मिती सुरू केली. ही पावडर मी स्वतः वापरून पाहिल्यानंतर व्यावसायिक स्वरूपात उत्पादन सुरू केलं. त्यानंतर एक प्रयोग म्हणून काही लोकांना ही पावडर वापरायला दिली. मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला; मात्र काही लोक पावडर घरी घेऊन जात आणि विशिष्ट चवीमुळे तिचा वापर मात्र कधी तरीच करत. हे माझ्या लक्षात आल्यावर मी पावडरऐवजी थेट उत्पादनंच तयार करण्यास सुरुवात केली. हे ही वाचा:केवळ 290 रुपयांची गुंतवणूक करून लखपती होण्याची संधी, कुठे अन् कसे गुंतवायचे पैसे 2018मध्ये प्रमोद यांनी नोकरी सोडली आणि मार्केट रिसर्च (Market Research) केला. शेवग्याच्या शेंगा आणि पानांपासून चिक्की बनवण्याचा व्यवसाय त्यांनी अभ्यास करून डिसेंबर 2018मध्ये सुरू केला. पहिल्या टप्प्यात ते स्वतः स्टॉल लावून चिक्की विक्री करत. तसंच त्यांनी या उत्पादनांची किंमत कमी ठेवली होती. त्यामुळे ग्राहकांकडून हळूहळू मागणी वाढत गेली. 15 लाखांची गुंतवणूक ते म्हणाले, काही काळानंतर मला एक गुंतवणूकदार भेटला. त्याने या व्यवसायात 15 लाखांची गुंतवणूक केली आणि पुण्यात ऑफिस सुरू केलं. त्यानंतर कंपनी रजिस्टर्ड केली. काही महिने काम उत्तम चाललं; मात्र कोरोनाचा संसर्ग सुरू होताच कामावर परिणाम झाला. लॉकडाउनमुळे काही महिने काम बंदच होतं. सुरुवातीला व्यवसायावर थोडा परिणाम झाला. त्यानंतर आरोग्यदायी पदार्थांना मागणी वाढल्याने आमच्या पदार्थांनाही मार्केट मिळू लागलं. लहान मुलं हेल्दी खाण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आम्ही मुलांसाठी शेवग्यापासून विविध फ्लेवर्सच्या चॉकलेटची (chocolate) निर्मिती सुरू केली. सुरुवातीला मी स्वतः मार्केटिंग करत होतो. हे ही वाचा:पैसे कमावण्याची सुवर्णसंधी, Aadhaar केंद्राची फ्रेंचायझी घेऊन सुरू करा व्यवसाय त्यानंतर आम्ही उत्पादनांच्या विक्रीसाठी मोठे रिटेलर्स, होलसेल डीलर्सशी संपर्क साधला. त्यात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. तसंच सोशल मीडियातूनही (Social Media) मार्केटिंग सुरू केल्याचं प्रमोद यांनी सांगितलं. 2 टन चॉकलेट, चिक्की उत्पादन प्रमोद यांनी सांगितलं, माझ्यासोबत 15 कामगार काम करतात. त्यात महिलांची संख्या जास्त आहे. आम्ही दररोज 2 टन चॉकलेट आणि चिक्की तयार करतो. खाकरा उत्पादनही मोठ्या प्रमाणात होतं. मागच्या महिन्यात आमची उत्पादनं श्रीलंकेतही गेली आहेत. तसंच अॅमेझॉन आणि इंडिया मार्टवरही आमची उत्पादनं उपलब्ध आहेत. चॉकलेट खाणं लहान मुलांसाठी अपायकारक मानलं जातं. या पार्श्वभूमीवर होममेड आणि ऑरगॅनिक (Organic) चॉकलेटला मागणी वाढली आहे. देशात अनेक उद्योग अशी चॉकलेट्स बनवतात. यात दिल्लीतल्या कोकोकॅल, चेन्नईतल्या कोकाट्रेट आणि पुण्यातील दिशा या उद्योगांचा समावेश आहे.  
Published by:Prem Indorkar
First published: