'राष्ट्रवादी'वाले असेच येत राहिले तर भाजप चोरांचा पक्ष बनेल - प्रकाश आंबेडकर

'राष्ट्रवादी'वाले असेच येत राहिले तर भाजप चोरांचा पक्ष बनेल - प्रकाश आंबेडकर

काँग्रेसला ऑफर दिली आहे. आणखी काही दिवस वाट पाहू आणि निर्णय घेऊ. आम्ही जास्त दिवस थांबू शकत नाही.

  • Share this:

पुणे 29 ऑगस्ट : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. राष्ट्रवादी हा भांडवलशाहीवादी आणि संधीसाधू पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, राष्ट्रवादीतील नेत्यांना आता भाजप हा निवडणुकीत विजय मिळवेल असं वाटतंय म्हणून ते जात आहेत. मात्र यामुळे भाजप हा चोरांचा पक्ष बनण्याची भीती आहे असा टोला त्यांनी लगावलाय. काँग्रेसला ऑफर दिली आहे. आणखी काही दिवस वाट पाहू आणि निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आंबेडकर म्हणाले, आरक्षणावर चर्चा करू असं मोहन भागवत म्हणतात तेव्हा RSSला आरक्षण नको असा अर्थ होतो. भाजप पुन्हा सत्तेत आला तर आरक्षण रद्द करतील म्हणून भाजप ला हरवलं पाहिजे असंही ते म्हणाले. Ed चौकशी किंवा राज्य बँक प्रकरणी गुन्हे हा केवळ फार्स असून कुणालाही अटक होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. अण्णा हजारे आता झोपले आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्रातल्या राजकारणातील मोठी बातमी; राणे या तारखेला करणार भाजपमध्ये प्रवेश!

काँग्रेस म्हणते आंबेडकरांनाच आघाडी नको

महाराष्ट्रात अडचणीत असलेल्या काँग्रेसला आणखी धक्का बसणार आहे. कारण वंचित आघाडी काँग्रेससोबत येण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याची कबूली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. दिल्लीत आज काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना त्यांनी ही कबूली दिली. सुरुवातीला छाननी समितीत वडेट्टीवार यांचं नाव घातलेलं नव्हतं. नंतर त्यांनी नाराजी व्यक्त करताच दिल्लीतून सूत्र हलली आणि त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं. मध्य प्रदेश काँग्रसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आजच्या बैठकीत राज्यातल्या सर्व 288 मतदार संघाचा आढावा घेण्यात आला.

पोळ्याच्या सणाला बैलांच्या डोळ्यात पाणी, शेतकरी झाला दीनवाणी!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात असलेल्या वॉर रुममध्ये छाननी समितीची ही पहिलीच बैठक होती. या समितीची दुसरी बैठक आता 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसला वंचितशी आघाडी करायची आहे मात्र त्यांनी अटीच अशा घातल्या आहेत की आघाडी करणं अशक्यच आहे. त्यांना काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छाच नाही अशी टीकाही त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली.

'काट डालूंगा...' नगरसेवकाचा टिक टॉक VIDEO VIRAL

वडेट्टीवार पुढे म्हणाले, कडूलिंबामध्ये कितीही साखर टाकली तर गोड होत नाही तसा प्रकार वंचित बहुजन आघाडीचा आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आम्ही वारंवार गेलो पण ते बोलायला तयार नाहीत. कधी म्हणतात RSS संदर्भात भूमिका जाहीर करा, कधी म्हणतात चाळीस जागा घ्या, तर कधी म्हणतात राष्ट्रवादी सोबत आघाडी तोडा हे कसं चालणार?

राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळे त्याला सोडणं कठीण आहे. संघाबद्दल तर आम्हीच स्पष्टच म्हटले होते की त्यांनी पत्रक तयार करावे आम्ही स्वाक्षरी करण्यास तयार तयार आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 09:35 PM IST

ताज्या बातम्या