S M L

पोस्टमन काका होणार हायटेक, पत्रांचं वाटप ड्रोनमधून!

लवकरच हे पोस्टमन काका हायटेक होणार आहेत. भविष्यात पोस्टमन काका सायकलऐवजी सेगवेवरून पत्रांचं वाटप करतील.

Sonali Deshpande | Updated On: Jan 20, 2018 06:42 PM IST

पोस्टमन काका होणार हायटेक, पत्रांचं वाटप ड्रोनमधून!

पुणे, 20 जानेवारी : डाकीया डाक लाया.... चिठ्ठी आयी है... ही गाणी ऐकताच आपल्याला लगेचंच पोस्टमनची आठवण होते. पोस्टमन पायपीट करून किंवा सायकलवरून लोकांपर्यंत त्यांची पत्र पाहून पोहोचवतात.  मात्र लवकरच हे पोस्टमन काका हायटेक होणार आहेत. भविष्यात पोस्टमन काका सायकलऐवजी सेगवेवरून पत्रांचं वाटप करतील.

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 13 व्या महापेक्समध्ये याची एक झलक पाहायला मिळाली. याशिवाय ड्रोनच्या माध्यमातून पत्रवाटपाचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2018 06:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close