• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • Weather Forecast: पुढील 4 दिवस पुण्यात जोरदार पाऊस; राज्यात 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Weather Forecast: पुढील 4 दिवस पुण्यात जोरदार पाऊस; राज्यात 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Weather in Pune: गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. आज पुण्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे.

 • Share this:
  पुणे, 19 जुलै: मागील तीन ते चार दिवसापासून पुण्यासह मुंबई आणि घाट परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. आज राज्यात पुण्यासह (Pune) एकूण नऊ जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red alert) जारी केली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे. तर संबंधित जिल्ह्यात उद्यापासून सलग चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार आहे. आज मुंबईसह, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा-सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा 60 लाख लोकांना बसणार फटका - टोपे पुढील चार दिवस पुण्यात मुसळधार पाऊस गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. आज पुण्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हेही वाचा-Weather Forecast: बळीराजाच्या संकटात वाढ; मराठवाड्यात वाढतोय ढगफुटीचा धोका याशिवाय, पुढील तीन तासांत मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांच्या कडकडासह वेगवान वाराही वाहण्याची शक्यता आहेत. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना, लांबचा प्रवास टाळण्याचा आणि मोठ्या झाडाखाली उभा न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञाकडून देण्यात आला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: