• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • शिक्षिका शिकवत असतानाच ऑनलाइन क्लासमध्ये लागला पॉर्न व्हिडीओ; पुण्यातील धक्कादायक प्रकार

शिक्षिका शिकवत असतानाच ऑनलाइन क्लासमध्ये लागला पॉर्न व्हिडीओ; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Crime in Pune: ऑनलाइन क्लासदरम्यान (Online class) अश्लील व्हिडीओ (Porn Video) सुरू केल्याच्या अनेक घटना सातत्यानं समोर येत आहेत. अशीच एक घटना आता पुण्यातील एका शाळेत उघडकीस आली आहे.

 • Share this:
  राजगुरूनगर, 02 ऑगस्ट: कोरोना विषाणूचा उद्भाव (Corona pandemic) झाल्यापासून जगभरातील शिक्षण क्षेत्र (Education sector) पूर्णपणे कोलमडून गेलं आहे. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून देशात अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाच्या (Online Education) पर्यायाचा अवलंब केला आहे. मात्र ऑनलाइन क्लास दरम्यान अश्लील व्हिडीओ (Porn Video) सुरू केल्याच्या अनेक घटना सातत्यानं समोर येत आहेत. अशातच आता पुण्यातील (Pune) एका शाळेतही असाच प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित घटना राजगुरूनगर (Rajgurunagar) येथील एका इंग्लिश मीडियम स्कूलमधील (English medium school) आहे. 30 जुलै रोजी शाळेतील एक शिक्षिका झूम अॅपच्या लिंकद्वारे कनेक्ट होऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवू लागताच, लेक्चरसोबत अश्लील व्हिडीओ देखील सुरू झाला. यावेळी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या क्लाससाठी उपस्थित होते. संबंधित प्रकार पाहून काही विद्यार्थ्यांनी चॅटबॉक्समध्ये मेसेज करत शिक्षिकेकडे याबाबत तक्रार केली. तसेच काहींनी याबाबत आपल्या पालकांना सांगितलं. हेही वाचा- मुंबईत ऑनलाइन क्लासमध्ये लावला पॉर्न व्हिडीओ; हॅकर्सनं VIDEO सुरू केला आणि... या घडलेल्या प्रकारानंतर बरेच विद्यार्थी ऑनलाइन क्लासमधून पटापट बाहेर पडली, तरीही अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याची माहिती संबंधित शिक्षिकेला कळाली नाही. या संतापजनक प्रकारनंतर दुसऱ्या दिवशी पालकांनी शाळेत जाऊन हा प्रकार मुख्यध्यापकाच्या कानावर घातला. यानंतर मुख्यध्यापकानं काही विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून या घटनेची पुष्टी केली आहे. हेही वाचा-Online class मध्ये विद्यार्थ्याचा प्रताप; पाहून शिक्षकही झाले शॉक संबंधित प्रकार सायबर गुन्हेगारानं केला असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. संबंधित घटनेची पूर्ण माहिती आम्ही घेतली असून याची रीतसर तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. सायबर गुन्हेगारानं हॅकिंगद्वारे हा प्रकार केल्याचा दावा शाळेकडून करण्यात आला आहे. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षिकेची चौकशी केल्यानंतर, पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: