• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण, आत्महत्येआधी 90 मिनिटं फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव आलं समोर!

पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण, आत्महत्येआधी 90 मिनिटं फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव आलं समोर!

एवढंच नाहीतर व्हिसेरा रिपोर्टमध्ये पूजा चव्हाण हिने आत्महत्येपूर्वी दारू पिल्याचं ही निष्पन्न झालं आहे.

  • Share this:
पुणे, 02 ॲागस्ट : पूजा चव्हाण आत्महत्या (pooja chavan case) प्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांनी मंत्रिमंडळात वापसीचे वेध लागले आहे. पण, आता पुणे पोलिसांच्या (pune police) फॉरेन्सिक रिपोर्टमुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे. आत्महत्येआधी पूजा आणि राठोड यांच्यात 90 मिनिटं फोनवर बोलणं झाल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे. पूजा राठोड प्रकरणात फॉरेन्सिक तपासात ऑडिओ क्लिप मधला आवाज हा संजय राठोड यांचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुमारे तीन आठवड्यापूर्वी पुणे पोलिसांना फॉरेन्सिक रिपोर्ट देण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, आत्महत्येपूर्वी सुमारे 90 मिनिट पूजा हीच संजय राठोड यांच्याशी फोनवर बोलणं झालं असल्याची माहितीसमोर आली आहे. एवढंच नाहीतर व्हिसेरा रिपोर्टमध्ये पूजा चव्हाण हिने आत्महत्येपूर्वी दारू पिल्याचं ही निष्पन्न झालं आहे. दारूच्या नशेत तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, असं असलं तरी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या जबाबात कुठलीही तक्रार नसल्याचं लिहून दिलंय. 7 फेब्रुवारी 2021 ला पूजा चव्हाणनं पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्येचा पुणे पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, आता पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागलेत. या पुराव्यात फोन रेकॉर्डिंग असून फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचं सांगितलं जात आहे. फोनवरील संपूर्ण संभाषण बंजारा भाषेत आहे. सध्या पोलीस हे संभाषण ट्रान्सलेट करुन घेताहेत. पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
First published: