मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'Sanjay Rathod' यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच नाही' : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

'Sanjay Rathod' यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच नाही' : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Home Minister Dilip Walse Patil on Sanjay Rathod: राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी क्लीन चिट दिली असल्याचं वृत्त समोर आलं. या वृत्तावर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 16 जुलै: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता याच संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट (Clean chit) दिली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं, "संजय राठोड यांच्या प्रकरणात पोलिसांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाहीये त्यामुळे क्लीन चिट देण्याचा प्रश्नच नाही, पुणे पोलीस तपास करत आहेत."

पूजाच्या आई-वडिलांचा जबाब

दरम्यान पूजा चव्हाण या तरुणीच्या आई-वडिलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांत जबाब दिला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आमची कोणाच्याही विरोधात तक्रार नाहीये आणि आमच्यावर कुणाचाही दबाव नाहीये. पूजाच्या आई-वडिलांनी दिलेल्या या जबाबानंतर पुणे पोलिसांनी माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट दिली असल्यांचं वृत्त समोर आलं. मात्र, आता यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देत क्लीन चीट देण्याचा प्रश्नच नाही असं उत्तर दिलं आहे.

राठोड यांचे मंत्रिमंडळात कमबॅक?

माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे संजय राठोड हे मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

First published:
top videos

    Tags: Sanjay rathod