चाकणमध्ये रिक्षांची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आमदार आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे आणि त्यांच्या कार्यर्त्यांविरोधात ऑटो रिक्षांची तोड़फोड़ केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2018 01:35 PM IST

चाकणमध्ये रिक्षांची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आमदार आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पुणे, 28 ऑगस्ट : शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे आणि त्यांच्या कार्यर्त्यांविरोधात ऑटो रिक्षांची तोड़फोड़ केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चाकण शहरातील तळेगाव चौकात नेहमीच वाहतूक कोंडी असते आणि ही कोंडी करणाऱ्या रिक्षांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवसेनेचे खेडचे आमदार सुरेश गोरे आणि कार्यकर्ते चक्क हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरले आणि गाड्यांची तोडफोड करण्यास सुरूवात केली. या प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

रविवारी रात्री ८च्या सुमारास तळेगाव चौकात हां प्रकार घडला तेव्हा आमदार गोरे ह्यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहनांना दिशा दाखवण्याचा काम केल. मात्र त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षांवर दमदाटी करायला सुरुवात केली. यातून झालेल्या बाचाबाचीनंतर गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट रिक्षांची तोडफोड करायला सुरुवात केली. या सगळ्यांनी मिळून तिथे उभ्या असलेल्या एकूण ७ रिक्षा फोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आता या प्रकरणी या सर्वाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत. मात्र या सर्व प्रकारानंतरही आमदार सुरेश गोरे यांच्याकडून या परिसरात बेकायदा रिक्षा चालवणाऱ्या चालकांना दमबाजी करणारी पोस्टरबाजी केली जात असल्याच बघयाला मिळतय. पण आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यामुळे यात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Loading...

 

जाने कहाँ गये वो दिन, आता उरल्या फक्त आठवणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2018 01:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...