पुणे, 12 ऑगस्ट : पुण्यात गुन्हे शाखेनं तब्बल 12 नामांकित स्टार हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर धाडी टाकल्या आहेत. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई करण्यात आली. यावेळी 6 ते 7 हजार तरुण-तरुणी या ठिकाणी आढळून आलेत. या हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून पहिल्यांदाच हुक्का पार्लरवर एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई काल(शनिवार)रात्री एक ते आज रविवार पहाटे चार या कालावधीत करण्यात आली. या हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात मोठ्या प्रमाणात तरूणाई असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्याची तरूणाई कोणत्या मार्गावर भरकटत चालली आहे याचा अंदाज तुम्हा सगळ्यांना आलाच असेल.
गेल्या काही दिवसांआधी नवी मुबंईतही असेच 4 मोठ्या बारवर छापे टाकण्यात आले. यात तब्बल 38 बारबालांना अश्लील चाळे करताना ताब्यात घेण्यात आलं. नवी मुंबईत नवनियुक्त झालेले पोलीस आयुक्त संजय यादव यांनी ही मोठी कारवाई केली होती. यातही तरूणाईचा मोठा सहभाग पहायला मिळाला.
दरम्यान, पुण्यात ही कारवाई कोरेगाव पार्क, मुंढवा, आणि चतुःश्रूंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅकलारेन्स पब, डेली ऑल डे, द बार स्टॉक एक्सचेज, वायकी, नाईट राईडर, नाईट स्काय, वेस्टीन, पेंटाहाऊस, हार्डरॉक, ओकवूड लाँज, ब्ल्यू शॅक, मयामी जे.डब्ल्यू मेरिएट या हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर ही कारवाई करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Big news, Hookah and bar, Police raid, Pune