S M L

उमर खालिद ,जिग्नेश मेवाणीवर तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दलित नेते उमर खालिद ,जिग्नेश मेवाणीवर शनिवारवाड्यावर तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. कोरेगाव भीमाच्या लढाईला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ३१ तारखेला शनिवारवाड्यावर पुरोगामी आणि डाव्या संघटनांनी एल्गार परिषद घेतली होती.

Sonali Deshpande | Updated On: Jan 4, 2018 11:58 AM IST

उमर खालिद ,जिग्नेश मेवाणीवर तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

04 जानेवारी : दलित नेते उमर खालिद ,जिग्नेश मेवाणीवर शनिवारवाड्यावर तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. कोरेगाव भीमाच्या लढाईला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ३१ तारखेला शनिवारवाड्यावर पुरोगामी आणि डाव्या संघटनांनी एल्गार परिषद घेतली होती. या परिषदेत उमर खालिद आणि जिग्नेश मेवाणी यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलवण्यात आल होतं.

या सभेत भाषण करताना या दोघांनी जातीयवादाचा संघर्ष हा सभागृहाबरोबरच रस्त्यावरही करावा लागेल असं वक्तव्य केलं होतं, हे वक्तव्य प्रक्षोभक असल्याची तक्रार अक्षय बिक्कड या तरूणांने विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी उमर खालिद आणि जिग्नेश मेवाणी याच्यावर आयपीसी १५३ अ,५०५ व ११७ प्रमाणे गुन्हा दाखल केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2018 11:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close