Home /News /pune /

Pune : शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Tweet प्रकरणी भाजयुमो प्रदेश सचिव पोलिसांच्या ताब्यात

Pune : शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Tweet प्रकरणी भाजयुमो प्रदेश सचिव पोलिसांच्या ताब्यात

Pune BJP Worker Detained सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू. प्रदीव गावडे यांनी बेकायदेशीर पद्धतीनं अटक केली असल्याचा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला आहे.

    पुणे, 22 मे : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे (BJYM) प्रदेश सचिव प्रदीप गावडे (Pradip Gavade) यांना सायबर पोलिसांनी (Cyber Police) शनिवारी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याबाबत ट्वीट (tweet) केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर नेत्यांवर आरोप प्रत्यारोप आणि त्यावरून होत असलेल्या कारवाईवरूनही आता नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वाचा-धुसफूस सुरूच; मंत्री,अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेना खासदाराची मागणी) प्रदीव गावडे हे भाजयुमोचे प्रदेश सचिव आहेत. त्यांनी केलेल्या एका ट्वीटसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जावळे यांनी तक्रार दाखल केली होती. मुस्लीम समाज, शरद पवार आणि रोहत पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर पोलिसांनी प्रदीप गावडे यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणं झालं आहे. सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू. प्रदीव गावडे यांनी बेकायदेशीर पद्धतीनं अटक केली असल्याचा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला आहे. (वाचा-Sagar Rana Murder: कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणी वाढल्या; CCTVमधून सत्य उजेडात) प्रदीप गावडे यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही या कारवाईबाबत ट्विट करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी ट्विट केलेल्या पोस्टचा फोटोही जोडला आहे. या ट्विट वरून माझ्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्याने तक्रार केल्याचे समजते, मुळात या ट्विट मध्ये चुकीचे काहीच नाही आणि या ट्विट साठी माझ्यावर शंभर तक्रारी झाल्या तरी चालतील पण मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा किंवा इतर कोणत्याही हिंदू महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, असं गावडे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यापूर्वीही भाजपच्या काही नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली होती. अशा प्रकारे सोशल मीडियावरील पोस्ट आणि त्यावर तक्रारी, कारवाईचा खेळ सुरुच आहे. मात्र राजकारणाच्या रणांगणावरून हे युद्ध आता सोशल मीडियाच्या मायाजाळापर्यंत पोहोचल्यानं याची व्याप्ती आणखी जास्तच वाढत जाणार यात शंका नाही. आता या अटकेचे नेमके कसे पडसाद उमटतात ते पाहावं लागणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyber crime, Maharashtra police, Mumbai, Pune, Sharad pawar

    पुढील बातम्या