खाकी वर्दीच्या आड गोरखधंदा, विनानंबर कारमधून पोलिसच करत होता गुटक्याची तस्करी

खाकी वर्दीच्या आड गोरखधंदा, विनानंबर कारमधून पोलिसच करत होता गुटक्याची तस्करी

एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असताना दुसरीकडे मात्र काही पोलिसच लॉकडाऊनचा सोयीस्कर फायदा करून घेताना दिसत आहेत.

  • Share this:

जुन्नर,12 एप्रिल: पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये खाकी वर्दीच्या आड गोरखधंदा सुरु असल्याची धक्कादायक उघड झाली आहे. एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असताना दुसरीकडे मात्र काही पोलिसच लॉकडाऊनचा सोयीस्कर फायदा करून घेताना दिसत आहेत. राज्यात बंदी असताना गुटक्याची तस्करी करणाऱ्या एका पोलिस कॉन्स्टेबललाच रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

किशोर धवडे असं आरोपी कॉन्स्टेबलचं नाव असून तो शिरूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. किशोर धवडे याला गुटक्याची वाहतूक करताना नारायणगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आरोपीला तत्काळ पोलिस सेवेतून बडतर्फ केले आहे.

हेही वाचा..BREAKING: दहावीचा भूगोलचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीची परीक्षा होणार नाही

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खाकी ड्रेस कोडवर पोलिस हवालदार किशोर ज्ञानदेव धवडे हा आपल्या साथीदार मौलाना हनीफ इब्राहम तांबोळीसोबत 30 हजार रुपये किमतीच्या गुटक्यासह विना नंबर स्विफ्ट कारमध्ये नारायणगावहून शिरुरकडे जात होता. तेव्हा त्याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मांजरवाडी येथून जाताना शुक्रवारी (ता.10) नाकेबंदीवर पोलीस पाटील सचिन टाव्हरे यांनी बिना नंबर प्लेटची गाडी दिसल्यानंतर या दोघांना हटकले. कोठे चाललात असे विचारलं असता त्यांनी आम्ही जेवणासाठी चाललो आहोत, असं सांगितलं. मात्र ते नारायणगावच्या दिशेने निघून गेले. ते जात असताना मौलानाकडे पोलीस पाटलांनी पाहिले. तेव्हा त्यांना संशय आला. पोलीस पाटील टाव्हरे यांनी सदर घटनेची माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना दिली.

हेही वाचा..मरकजमध्ये सहभागी झाले आणि महाराष्ट्रात आले, 156 परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल

शनिवारी (ता11) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास स्विफ्ट गाडी नारायणगावच्या बाजूने जोरात येताना दिसली. ती गाडी नारायणगाव मांजरवाडीमार्गे शिरुरकडे जाताना नाकाबंदीदरम्यान गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉन्स्टेबल किशोर धवडे याने गाडी थांबवली नाही. गावकऱ्यांनी काठीने कारवर प्रहार केला. याबाबत नारायणगाव पोलिस स्टेशनला माहिती कळवली. परंतु पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या गाडीवर नाकेबंदीवर तैनात असणाऱ्या होमगार्ड व गावकऱ्यांनी लाठीचार्ज करून दोघांना ताब्यात घेतलं. नारायणगाव पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास करत आहे.

शिरुर पोलीस दुसऱ्यांदा सापडला जाळ्यात..

दरम्यान, वर्षभरापूर्वी शिरुर पोलिस स्टेशनचा एक पोलीस कॉन्स्टेबल पोपट गायकवाड हा अशाच एका गुटका रॅकेटमध्ये सापडला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक सुद्धा झाली होती. मात्र अनेक पोलीस आणि अधिकारी यात अडकतील या भीतीने पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांची लक्तरे पुन्हा एकदा गुटखा माफियांच्या वेशीवर लटकावली गेली आहेत.

हेही वाचा... कोरोनाचा कहर असताना दिल्लीत भूकंपाचे धक्के, 'देवा काय आहे मनात?'

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आरोपी पोलिस कॉन्स्टेबल किशोर धवडे याला सेवेतून बडतर्फ केलं आहे. मात्र, या अनुषंगाने समोर आलेल्या जुन्या प्रकरणाचा तपाल पुन्हा सुरु होईल का, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 12, 2020, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading