Home /News /pune /

गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, भाजपच्या गोटात खळबळ

गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, भाजपच्या गोटात खळबळ

जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या एका संचालकाचे अपहरण करण्यात आले होते.

पुणे, 05 जानेवारी  :  जळगाव विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी  भाजप (BJP) नेते आणि माजी महसूल मंत्री गिरीश महाजन (Girish Mhajan) यांच्यावर पुण्यात (Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महाजन यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जानेवारी 2018 ते 2021 या दरम्यान ही घटना घडली होती.  जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या एका संचालकाचे अपहरण करून  पुण्यातील सदाशिव पेठेतील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव आणला होता. तसंच खंडणी स्वरूपात 5 लाख उकळण्यात आले होते. हा प्रकार इथेच थांबला नाही, जळगावला जाऊन संस्थेची तोडफोड देखील करण्यात आली. आईसोबत झोपलेल्या 3 वर्षांच्या चिमुरडीला उचलून नेलं, पालघरमधील धक्कादायक घटना या प्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय पाटील (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जळगाव येथील असून, ते वकील आहेत. तर ते जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत. दरम्यान त्यांना आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. मास्क लावला नाही म्हणून टॅक्सी चालकानं गाडी नेली पोलीस ठाण्यात आणि... त्या ठिकाणी त्यांचे हात-पाय बांधून डांबून ठेवले. यानंतर त्यांना मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला.  फिर्यादी यांच्यासोबत असलेल्याला देखील त्यांनी याठिकाणी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 5 लाख रुपयांची खंडणी घेतली होती. तर त्यांच्या खिश्यातील पैसे आणि सोन्याचे दागिने लुटले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडला होता. परंतु, त्यांनी तक्रार उशिरा केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरुड हे तपास करत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या