कोरोनाविरुद्ध लढा: घरी परतलेल्या दाम्पत्याचं असं स्वागत, राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा

कोरोनाविरुद्ध लढा: घरी परतलेल्या दाम्पत्याचं असं स्वागत, राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा

संभाजीनगर परिसरात राहणारी एक महिला व तिचा पती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 1 मे: कोरोनामुक्त झालेल्या दाम्पत्याचा ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या माजी महापौर विद्यमान नगरसेविका मंगला कदम, अमय सुधीर नेरूरकर, कल्पेश गजानन हाने आणि संतोष शिवाजी वराडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस हवालदार गोविंद मधुकर गुरव यांनी गुरूवारी निगडी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी मंगला कदम यांनी पोलिसांचे आरोप फेटाळले आहेत.

हेही वाचा... Lockdown संपल्यानंर अशी असेल केंद्राची योजना, मोदींनी मंत्र्यांसोबत केली चर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर परिसरात राहणारी एक महिला व तिचा पती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाविरोधात लढा देऊन घरी परत आलेल्या दाम्पत्याचं नगरसेविका मंगला कदम यांनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. आणीबाणी सदृश्य परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक अन्सार शेख याबाबत अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा...RED ZONEची नवी यादी; यानुसारच निर्बंध करणार शिथिल, तुमचा जिल्हा कुठल्या झोनमध्ये

दुसरीकडे, पुण्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवत वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील वाढीव कोरोनाबाधित रुग्णांना पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचारसाठी हलवण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, पुण्यातील रुग्ण पिंपरीत आल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येईल, असं म्हणत पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे.

पिंपरी-चिंचवडची यंत्रणा पुण्याच्या तुलनेत तुटपुंजी आहे. पिंपरीतील रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत पुण्याचे रुग्ण पिंपरीत पाठवले गेले तर सर्व यंत्रणा विस्कळीत होण्याची भीती आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील रुग्णांना पिंपरी-चिंचवडमध्ये पाठवू नये, असं आमदार लांडगे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा.. पालघर साधू हत्याकांड प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आणखी 5 आरोपींना अटक

भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीचाही विरोध...

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्ण पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याच्या हालचाली सुरु आहे. यास भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेगी विरोध केला आहे. आधीच पिंपरीत वैद्यकीय सुविधा कमी मर्यादित आहेत. त्यात पुण्यातील रुग्ण उपचारासाठी पिंपरीत आणल्यास येथे रुग्ण वाढल्यास कुठे जाचयं, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोणत्याही पक्षाने ऐन संकटात प्रतिष्ठेचा मुद्दा करु नये. एका परिस्थिती सगळ्यांनी एकत्र येऊन कोरोनास हद्दपार करावे, अशी भूमिका शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: May 1, 2020, 5:11 PM IST
Tags: #Pune

ताज्या बातम्या