Home /News /pune /

पुणे: फरार आरोपीनं पोलिसांच्या अंगावर कार घालत काढला पळ, 130 किमी सिनेस्टाईल पाठलाग करत आवळल्या मुसक्या

पुणे: फरार आरोपीनं पोलिसांच्या अंगावर कार घालत काढला पळ, 130 किमी सिनेस्टाईल पाठलाग करत आवळल्या मुसक्या

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Pune: फसणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला रत्नागिरी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 130 किमी पाठलाग केल्यानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

    शिरवळ, 02 फेब्रुवारी: फसणुकीचा गुन्हा (Money fraud case) दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला रत्नागिरी पोलिसांनी (Ratnagiri police) सिनेस्टाईल पाठलाग करत बेड्या ठोकल्या (arrested accused by chasing 130 km) आहेत. संबंधित आरोपी कारमध्ये बसून आपल्या पत्नीशी गप्पा मारत असताना पोलिसांनी त्याच्यावर झडप मारली. पण आरोपीनं चलाखी करत पोलिसांच्या अंगावर कार घालून घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर पोलिसांनी तब्बल 130 किलोमीटर आरोपीचा पाठलाग करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आणि आरोपीमधील हा फिल्मी थरार तब्बल तीन तास सुरू होता. त्यानंतर आरोपीला जेरबंद करण्यात आलं आहे. संबंधित घटना पुणे जिल्ह्यातील वेल्हा याठिकाणी घडली आहे. तर संतोष विश्वनाथ जगदाळे असं अटक केलेल्या 40 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बोपदेव येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जगदाळे याच्यावर काही दिवसांपूर्वी रत्नागिरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेही वाचा-धावत्या कारवर बसून तरुणाचा जीवघेणा स्टंट;मुंबई पोलिसांनी घडवली अद्दल, पाहा VIDEO गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी जगदाळे फरार होता. गेल्या काही काळापासून तो सतत पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होतं होता. त्यामुळे रत्नागिरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे आपल्या पोलीस पथकासह खाजगी कारने आरोपीला पकडण्यासाठी शिरवळ येथे आले होते. दरम्यान आरोपी जगदाळे हा शिंदेवाडी फाट्याहून भोरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हेही वाचा-पुण्यात महाविद्यालयीन तरुणासोबत अघोरी कृत्य; मारहाण करत ब्लेडनं कापल्या... त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले. यावेळी आरोपी जगदाळे हा रस्त्याच्या कडेला गाडी लावून आपल्या पत्नीशी गप्पा मारत होता. पोलिसांनी आरोपीच्या कारवर झडप मारून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्वरित सावध झालेल्या आरोपीनं पोलिसांच्या अंगावर कार घालून तेथून पळ काढला. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी आरोपीचा तब्बल 130 किमीपर्यंत पाठलाग केला. तीन तास रस्त्यावर सिनेस्टाईल थरार घडल्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपी जगदाळे याला अटक केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Ratnagiri

    पुढील बातम्या