Home /News /pune /

पुण्यात चक्क मौज-मजेसाठी वाहनांची चोरी, आरोपी तरुणांना पोलिसांनी केली अटक

पुण्यात चक्क मौज-मजेसाठी वाहनांची चोरी, आरोपी तरुणांना पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वाहन चोरीचे विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पुणे, 16 ऑक्टोबर : मौज-मजेसाठी तरुणांना चक्क वाहन चोरीचा छंद जडल्याचा प्रकार पुणे शहरात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रदीप राजू अडगळे (वय 27 वर्ष, रा येरवडा पुणे) आणि एक विधिसंघर्ष ग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वाहन चोरीचे विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. येरवडा भागात वाहन चोरीच्या अनुषंगाने पोलीस उपआयुक्त परि 4 यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरी तपास पथक नेमण्यात आले होते. वपोनि येरवडा पोलीस स्टेशन यांच्या सूचनांनुसार हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून वाहन चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. दरम्यान, पोलिसांनी तापस केलेल्या गुन्ह्यांमध्ये एकूण 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या 08 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त श्री नामदेव चव्हाण, मा पोलीस उप आयुक्त श्री पंकज देशमुख, मा पोलीस उप आयुक्त श्रीमती सपना गोरे,सपोआ येरवडा विभाग श्री किशोर जाधव, व पो नि युनूस शेख, पो नि गुन्हे अजय वाघमारे,सपोनि करपे, यांचे मार्गदर्शनाखाली पो उ नि मंगेश भांगे, पोलीस नाईक कानिफनाथ कारखेले, वाघ, निकम, पो शि परदेशी, पडोळे, साळवी,भोरडे,भरगुडे,सकट, शेख पवार यांनी केली आहे. येरवड्यात वाहनांचं जळीतकांड एकीकडे येरवडा परिसरातच वाहन चोरणाऱ्या तरुणांचा पर्दाफाश झाला असतानाच येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील संतोष मित्र मंडळ जवळ पहाटे अज्ञात इसमांनी 5 दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मीनगर परिसरात वारंवार दुचाकी जाळण्याचे प्रकार होत आहेत. स्थानिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर येरवडा पोलिसांचा वचक नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असून स्थानिक रहिवाशी दहशतीखाली आहेत. येरवडा पोलीस घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune, Pune crime, Pune police

पुढील बातम्या