WhatsAppवर राजकीय कमेन्ट करताना सावधान, पोलिसांनी बजावल्या 68 Group Adminना नोटीसा

WhatsAppच्या माहितीमुळे सामाजिक शांतता भंग केल्याचं आढळल्यास त्यासाठी Group Adminना जबादार धरणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 09:39 PM IST

WhatsAppवर राजकीय कमेन्ट करताना सावधान, पोलिसांनी बजावल्या 68 Group Adminना नोटीसा

मुंबई 03 ऑक्टोंबर : निवडणुकीच्या काळात WhatsAppवर लिहणाऱ्यांचा सुकाळ असतो. काही घटना घडताच काही वेळात WhatsAppच्या माध्यमातून माहिती जगभर पोहोचते. माहिती लवकर पोहोचत असली तरी त्याचा गैरवापर होत असल्याचं अनेकदा दिसून आलंय. हा गैरवापर रोखण्यासाठी पोलिसांनी पोलिसांनी WhatsAppच्या  Group Adminना नोटीसा बजावायला सुरूवात केलीय. पुणे जिल्ह्यातल्या तब्बल 68 जणांना अशा प्रकारच्या नोटीसा बजावल्या असून WhatsAppच्या माहितीमुळे  सामाजिक शांतता भंग केल्याचं आढळल्यास त्यासाठी Group Adminना जबादार धरणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

WhatsApp सध्या एवढी माहिती येते की त्याला WhatsApp विद्यापीठ असं नाव पडलंय. पण यावर सकारात्मक माहिती देण्यापेक्षा टिंगल टवाळी करण्याकडेच लोकांचा कल दिसून येतो. आक्षेपार्ह माहिती, फोटोंचा गैरवापर करून नवे फोटो तयार करणं, खोटी माहिती पसरविणं, ज्या घटना घडल्याच नाहीत अशा घटना झाल्याचं सांगणं असे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.

उदयनराजेंपेक्षाही अबू आझमी श्रीमंत, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकीत!

त्यामुळे खोट्या बातम्या झपाट्याने पसरल्या जातात. आणि त्यामुळे समाजिक शांतता भंग होऊ शकते. अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाल्याचं आढळून आलंय. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. WhatsAppवर सातत्याने माहितीचा रतीब असतो. पण आपल्या ग्रुपवर अशी आक्षेपार्ह माहिती येवू नये याची काळजी संबंधीत Group Adminनेच घ्यावी असं पोलिसांनी बजावलं आहे.

भाजपची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे, विनोद तावडे वेटिंगवरच

Loading...

अनेकदा चारित्र्यहनन करणं, बदनामी करणं, खच्चीकरण करणं, धमक्या देणं यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे मोठं नुकसानं होतं. निवडणुकांचा काळ हा अतिशय संवेदनशील असतो. काही घडल्यासं त्याचे तात्काळ पडसाद उमटू शकतात. त्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात येवू शकते. ही सगळी शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे Group Adminनेच आता काळजी घेवून अशा लोकांना परावृत्त करणं किंवा असे ग्रुप्स बंद करणं गरजेचं आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी कलम 149 नुसार या नोटीसा बजावल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...