पुणे, 15 जानेवारी : सलग गैरहजर राहाणाऱ्या 158 कंत्राटी कामगारांना तुकाराम मुंडेनी केल कामवरून बडतर्फ केलं आहे. पीएमपीएमएलच्या 158 कामगार सलग 150 दिवस कामावर आले नाहीत म्हणून त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्याआधी या सर्वांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या पण तरीही हे कामगार कामावर रुजू झाली नाहीत. आणि म्हणून त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना योग्य शिस्त लागावी म्हणून कायम गैरहजर राहाणारे, वेळेवर न येणारे किंवा कामच न करणारे अशा सर्व कामगारांवर तुकाराम मुंडे यांनी कारवाई केली होती. मात्र ती तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई होती. त्याचा कामागारांवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे कडक आणि शिस्थीचे पक्के असणारे पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी ही मोठी कारवाई केली आहे.
खरं तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना महिन्यातून २२ दिवस काम करण्याची सक्ती करारामध्ये करण्यात आली आहे. मात्र अनेक कर्मचारी मनमानी पध्दतीनं गैरहजर राहत असल्याच दिसून येत होतं. पण आता मुंडे यांनी कडक पवित्रा घेत 158 जणांचे करार संपवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bus driver, PMPML, Pune, Tukaram mundhe