पुणे, 28 नोव्हेंबर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी देशात कोरोना लस विकसित करणाऱ्या प्रमुख कंपन्यांना भेट दिली. यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी सीरम इन्स्टिट्यूट भेट देऊन कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतल्याची माहिती सीरमचे संचालक आदर पूनावालांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना लसचं वितरण सर्वात आधी भारतात करणार असल्याची मोठी घोषणा आदर पूनावाला यांनी यावेळी केली. त्यामुळे लवकरच भारतात कोरोना लस उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा करण्यात येत आहे.
हेही वाचा...कोरोनाग्रस्तांचे पडतायेत दात; CORONA चं नवं लक्षण तर नाही ना?
आदर पूनावाला यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोंदीसोबत कोरोना लसीवर सखोल चर्चा झाली. लसीकरणाच्या अंमलबजावणी, लसींच्या साठवणूक तसेच सीमरमधील सुविधांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. मात्र, लसीच्या किंमतीवर चर्चा झाली नाही. लसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दर ठरवता येतील, असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं. जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींचं लक्ष्य असल्याचं पूनावाला यांनी सांगितलं. लस कशी वितरित करायची, कुठे करायची, किती प्रमाणात करायची ,किंमत किती असावी, किती डोस लागतील, याची चर्चा पंतप्रधानसोबत झाली. लसीबाबत योग्य माहिती प्रसारित करा.नागरिक पॅनिक होणार नाही, चुकीची माहिती प्रसारित करू नका, आधी शासकीय यंत्रणा किंवा निर्मात्यांकडून माहितीची खातरजमा करून घ्या, अशा सुचना पंतप्रधान मोदींनी दिल्याचंही आदर पूनावाला यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे सरकारच्या मागणीनुसार लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे.
We are in the process of applying for emergency use authorization of Covishield in the next two weeks: Serum Institute of India CEO Adar Poonawalla pic.twitter.com/v1FYDwgGkE
— ANI (@ANI) November 28, 2020
या नागरिकांना आधी मिळणार कोरोना लस...
आधी 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लस देण्यात येईल तर त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी पुढील टप्प्यात लसीची निर्मीती करण्यात येईल, अशी माहिती पूनावाला यांनी दिली. लसीच्या पुरवठ्यासाठी साठवण्यासाठी लागणारी यंत्रणा सीरमकडे उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. 60 टक्क्यांपर्यंत परिणामकारकता दिसून असून ही लस उत्तम आहे. चाचणीत एकालाही रुग्णालयात जावं लागलं नाही हे सगळ्यात महत्वाचं असल्याचं आदर पूनावाला यांनी यावेळी सांगितलं.
आदर पूनावाला यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...
-लसीच्या किमतीवर चर्चा झाली नाही
-सरकारच्या मागणीनुसार लसीचा पुरवठा करणार
-लसीचं वितरण सर्वात आधी भारतात होणार
-आधी 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लस देण्यात येईल त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नंतर लस आणू
- जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींचं लक्ष्य
-लसीच्या पुरवठ्यासाठी साठवण्यासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध
-पंतप्रधानासोबत लसीवर चर्चा झाली
-प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दर ठरवता येतील
-वेगवेगळ्या लसीच्या प्रक्रिया परिणामकारकता यावर चर्चा झाली
-अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली
-लसीच्या परिणामकारतेवर चर्चा
-केंद्र सरकारच्या मागणीप्रमाणे लस पुरवठा करण्याचं आश्वासन दिलंय
- 60%पर्यंत परिणामकारकता दिसून आलीय
-आधी भारतात लस पुरवठा करणार
- ही लस उत्तम ,चाचणीत एकालाही रुग्णालयात जावं लागलं नाही हे सगळ्यात महत्वाचं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Pune