मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

कोरोना लस लवकरच! पंतप्रधान मोदींचं 'मिशन व्हॅक्सिन', पुण्यात लस निर्मितीची पाहणी

कोरोना लस लवकरच! पंतप्रधान मोदींचं 'मिशन व्हॅक्सिन', पुण्यात लस निर्मितीची पाहणी

कोरोना लसीबाबत लवकरच मिळेल, अशी अपेक्षा

कोरोना लसीबाबत लवकरच मिळेल, अशी अपेक्षा

कोरोना लसीबाबत लवकरच मिळेल, अशी अपेक्षा

  • Published by:  Sandip Parolekar

पुणे, 28 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शनिवारी देशातील कोरोना लस  (Corona Vaccine) विकसित करणाऱ्या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन 'मिशन व्हॅक्सिन' पूर्ण केलं. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद येथील , हैदराबाद आणि पुणे येथे भेट देऊन कोरोना लसीचा घेतला.

पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान मोदींनी भेट दिली. कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत आढावा घेतला.

पंतप्रधान जवळपास तासभर तास सीरममध्ये होते. त्यामुळे कोरोना लसीबाबत लवकरच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा...'पुणेकरांनी शोधलेल्या Corona Vaccine वर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये'

कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात असताना त्यावर मारा करण्यासाठी कोरोना लस हाती येणं अत्यंत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता कोरोना लसीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी एकाच दिवशी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा दौरा करत संबधित संस्था व कंपनीना भेट देत लस उत्पादनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. एवढंच नाही तर लस निर्मात्या कंपन्या आणि शास्त्रज्ञांना कामगिरीबद्दल शुभेच्छाही दिल्या.

53 मिनिटांत आटोपला पुणे दौरा...

पुणे विमानतळावरून पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरनं मांजरी येथील सीरम इन्स्टिट्युटमध्ये आगमन झाले. सीरमचे सायरस पूनावाला आणि अदर पूनावाला यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. यावेळी अदर पूनावाला यांनी पंतप्रधानांना  कोरोना लस उत्पादनाबाबत तपशीलवार माहिती दिली. त्यानंतर सीरमच्या शास्त्रज्ञांशीही पंतप्रधानांनी चर्चा केली. या बैठकीनंतर लसचं उत्पादन जिथे सुरू आहे, त्या लॅबलाही पंतप्रधानांनी भेट दिली. लसची निर्मिती, साठवणुकीची तयारी आणि नागरिकांपर्यंत लस कशी नेता येईल, यावर त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येतआहे. जवळपास तासभर पंतप्रधान सीरम इन्स्टिट्युटमध्ये होते.

दरम्यान, 'सीरम इन्स्टिट्युट'मध्ये अॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन घेण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या लसीचे वितरण करण्याबाबत बैठका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधानांनी सीरमला भेट दिली.

हेही वाचा...रोहित पवारांनी केलं पंतप्रधान मोदींचं स्वागत, भाजप नेत्यांकडे केली 'ही' अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले तेव्हा मोजक्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. ले.जनरल सी.पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Maharashtra, Pm modi, Pune, Pune news