पुण्यात भाजप कार्यालयाबाहेर नरेंद्र मोदींच्या फ्लेक्सवर लावले शेण

पुण्यात भाजप कार्यालयाबाहेर नरेंद्र मोदींच्या फ्लेक्सवर लावले शेण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवर शेण लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. फ्लेक्सवरीस नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी शेण लावले.

  • Share this:

अंनिस शेख, (प्रतिनिधी)

मावळ, 31 ऑगस्ट- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवर शेण लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. फ्लेक्सवरीस नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी शेण लावले. देहूरोड येथील बाजारपेठेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेली माहिती अशी की, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्स बोर्डवर जाणीवपूर्वक शेण लावले. ही घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पक्ष कार्यालयाची साफसफाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यास निदर्शनास ही बाब आली. त्याने तत्काळ देहूरोड शहरातील भाजपचे पदाधिकारी तसेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तत्काळ फ्लेक्स हटवून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.

देहूरोड शहरात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. भाजपचे शहराध्यक्ष कैलास पानसरे, विशाल खंडेलवाल यांच्यासह पक्ष कार्यकर्त्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला 'या' एका कारणामुळे लागू शकतो ब्रेक

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार आणि साताऱ्यातील डॅशिंग नेते उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत लवकरच उदयनराजे भाजपमध्ये दाखल होतील, अशी चर्चा आहे. पण उदयनराजेंच्या भाजप प्रवेशात काही अडचणी असल्याचंही बोललं जाऊ लागलं आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले. उदयनराजेंना तिकीट देण्यात येऊ नये, असा आग्रह साताऱ्यातील नेत्यांनी पक्षाकडे धरला होता. मात्र उदयनराजेंचा वैयक्तिक करिष्मा पाहता राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सातारा लोकसभेतून त्यांनाच संधी दिली.

उदयनराजेंनीही पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा पराभव केला. पण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल झाला आहे. देशभरात भाजपने मिळवलेल्या मोठ्या यशामुळे आघाडीतील नेतेही भाजपकडे ओढ घेऊ लागले आहेत. अशातच उदयनराजे भोसले हेदेखील पक्षबदलाच्या विचारात असल्याचं पाहायला मिळत आहे.

गणपती बाप्पांनी बुजवले रस्त्यांवरचे खड्डे, पाहा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 31, 2019, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading