कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या पुण्यातल्या सिस्टरला थेट नरेंद्र मोदींचा फोन, दिली कौतुकाची थाप

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या पुण्यातल्या सिस्टरला थेट नरेंद्र मोदींचा फोन, दिली कौतुकाची थाप

'तुम्ही सगळ्या देशाचा कारभार बघता, एवढे व्यस्त असुनही तुम्ही फोन करून आम्हाला धीर दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद .'

  • Share this:

पुणे 27 मार्च :  देशात महाराष्ट्रात कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. या दोन्ही शहरांतल्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी जोखीम पत्करत आपली सेवा देत आहेत, रुग्णांवर उपचार करत आहेत. याच सगळ्या कर्माचाऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून मोदींच्या आवाहनानंतर सगळ्या देशाने त्यांचं थाळी आणि घंटानाद करत अभिवादन केलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या छाया सिस्टला फोन केला आणि त्यांचं कौतुक केलं. सगळा देश तुमचा कृतज्ञ आहे असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांच्या कौतुकाने छाया सिस्टर भारावून गेल्या आहेत.

काय सिस्टर कश्या आहात? असा प्रश्न मोदींनी त्यांना मराठीतूनच विचारला. तुम्ही काळजी घ्या, तुमच्या कुटुंबीयांचीही काळजी घ्या असं ते सिस्टर छाया यांना म्हणाले. तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात. तुमचे अनुभव कसे आहेत  असंही त्यांनी छाया यांना विचारलं. त्यानंतर छाया यांनी त्यांचे अनुभव पंतप्रधानांना सांगितले.

आम्ही आमचं कर्तव्य करत आहोत. तुम्ही सगळ्या देशाचा कारभार बघता, एवढे व्यस्त असुनही तुम्ही फोन करून आम्हाला धीर दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद असं छाया सिस्टर पंतप्रधानांना म्हणाल्या.

LockDown ची ऐशीतैशी : रस्त्यावर हजारो लोकांचा जथ्था, पाहा धक्कादायक VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करणाऱ्या भाषणाकडे प्रत्येक भारतीय डोळे लावून होता. आतापर्यंत मोदींच्या सर्व भाषणांपैकी लॉकडाऊनच्या भाषणाने रेकॉर्ड तोडल्याची माहिती समोर आली आहे.

बार्क इंडिया रेटिंग्जने ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मंगळवारी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. यापूर्वी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती.

टिव्ही रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्टिंग ऑडियंस रिसर्च काउन्सिल (बीएआरसी) च्या रेटिंगनुसार मोदींचे लॉकडाऊनचे भाषण त्यांच्या “जनता कर्फ्यू” आणि नोटाबंदीसह मागील सर्व भाषणांपेक्षा जास्त पाहिलं गेलं.

संबंधित - लॉकडाऊनमध्ये प्रेयसीला भेटणं बेतलं जीवावर, गावकऱ्यांकडून तरुणाची गळा चिरुन हत्या

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी ट्वीट केले की, “बार्क इंडियाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 24 मार्च रोजी लॉकडाऊनसंदर्भात केलेले भाषण टिव्हीवर सर्वाधिक पाहिलं गेलं आहे. त्याच्या तुलनेत आयपीएलचा अंतिम सामना पाहणाऱ्यांची संख्याही मागे पडली आहे. हे भाषण सुमारे 201 चॅनलवर दाखविण्यात आले. आयपीएलची अंतिम मॅच 13.3 कोटी जनतेने पाहिली होती. तर पंतप्रधान मोदींचे लॉकडाऊनचे भाषण 19.7 कोटी लोकांनी पाहिली.

 

First Published: Mar 27, 2020 11:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading