Home /News /pune /

PM मोदींचा अमेरिकेतून थेट पुण्यात फोन; UPSC टॉपर शुभमचं केलं कौतुक!

PM मोदींचा अमेरिकेतून थेट पुण्यात फोन; UPSC टॉपर शुभमचं केलं कौतुक!

UPSC टॉपर शुभमचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Marendra Modi) यांनी अमेरिकेतून थेट पुण्यात फोन (Called from America to Pune) केला आहे.

    पुणे, 26 सप्टेंबर: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील एकूण 761 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी देखील घवघवीत यश संपादन केलं आहे. या परीक्षेत बिहारमधील शुभम कुमार (Shubham Kumar) हा देशात प्रथम आला आहे. डिफेन्समध्ये प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेला शुभम कुमार सध्या पुण्यात प्रशिक्षण घेत आहे. UPSC टॉपर शुभमचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Marendra Modi) यांनी अमेरिकेतून थेट पुण्यात फोन (Called from America to Pune) केला आहे. लोकसेवा आयोगाने घेतललेल्या या परीक्षेत देशाभरातून एकूण 761 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 545 मुलांसह आणि 216 मुलींचा समावेश आहे. देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाणाऱ्या या UPSC परीक्षेत बिहारच्या शुभम कुमारने बाजी मारली आहे. शुभम कुमार हे बिहारमधील (Bihar) कटिहार (Katihar) येथील रहिवासी आहेत. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर न्यूज 18 ने शुभम यांच्याशी संवाद साधला. त्या मुलाखतीतून त्यांच्या यशाची रहस्यं उलगडली. ते सहाव्या इयत्तेत शिकत असताना अशी एक घटना घडली होती, की त्यामुळे त्यांनी कटिहार सोडून पाटणा (Patana) इथे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. शुभम यांनी सांगितलं, 'मी सहावीत असताना एका प्रश्नाचं उत्तर मी योग्य दिलं होतं; मात्र माझं उत्तर चूक असल्याचं एका शिक्षकांनी सांगितलं होतं. माझं उत्तर योग्य असल्याची मला खात्री आणि विश्वास होता. शिक्षकांच्या या कृत्यामुळे मी दुःखी झालो आणि माझा मूड बदलला. हेही वाचा-UPSC Results: दोन सख्ख्या बहिणी एकाच वेळी यूपीएससीत यशस्वी; जैन भगिनींची यशोगाथा तेव्हाच मी शिक्षणासाठी पाटण्याला जायचा निर्णय घेतला. मला पाटण्याला जाऊन चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, असं मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं. त्यांनीही मला विरोध केला नाही. तेव्हाच माझ्या आयुष्याला वळण मिळालं. माझं पुढचं शिक्षण पाटणा आणि बाकीच्या शहरांत झालं. त्याचीच परिणती म्हणून मला आज हे यश मिळालं आहे.' हेही वाचा-एकाच घरी दोन अधिकारी! गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कन्येनं क्रॅक केली UPSC शुभम यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी मी दिल्लीला गेलो होतो. पण कोणत्या तरी विशिष्ट शहरात जाऊन किंवा एखाद्या विशिष्ट (Coaching Class) कोचिंग क्लासमध्ये गेलं, तरच परीक्षेची तयारी होऊ शकते असं काही नाही. या परीक्षेची तयारी कोणीही विद्यार्थी कुठेही करू शकतो. फक्त त्या विद्यार्थ्याचं अभ्यासाप्रति डेडिकेशन (Dedicated Study) अर्थात समर्पण असलं पाहिजे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pm modi, Upsc

    पुढील बातम्या