• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • असा असेल नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, तासभरात कोरोना लस निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार

असा असेल नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, तासभरात कोरोना लस निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार

कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ते समजून घेणार

  • Share this:
पुणे, 26 नोव्हेंबर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान या दौऱ्यात पुण्यातीस सीरम इनस्टीट्युटला (Serum Institute Pune) भेट देणार आहेत. कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ते समजून घेणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इनस्टीट्युटला भेट देऊन तिथं सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत. हेही वाचा...मनसे मोर्चाला हिंसक वळण, वीज कार्यालयाची तोडफोड, अभियंत्याच्या कॅबिनचीही नासधूस असा असेल पंतप्रधानांचा पुणे दौरा... 28 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजून 25 मिनिटांला अहमदाबाहून पुणे विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरूनच ते थेट सीरम इनस्टिट्यूटला हेलिकॉप्टरनं रवाना होतील. दुपारी 1 वाजून 05 मिनिटं ते 2 वाजून 05 मिनिटं या एक तासांच्या कालावधीत ते सीरम इनस्टिट्यूटला भेट देतील. संबंधित अधिकाऱ्यांकडून कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतील. नंतर ते पुन्हा विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांला पुणे विमानतळावरून तेलंगाणाकडे रवाना होतील. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसची निर्मितीचं काम सुरू आहे. त्यामुळे या लसीकडे संपूर्ण देशासह जगाचे लक्ष लागलं आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं तयारी सुरू केल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या दौऱ्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता होती. मात्र, 100 देशांचे राजदूत 4 डिसेंबर रोजी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. प्रतीक्षा संपली, उरले फक्त काही दिवस.. दरम्यान, प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलं आहे, ते कोरोना लशीकडे (corona vaccine). पुढील वर्षात कोरोनाची लस येण्याची आशा आहे. मात्र कधीपर्यंत येईल असा प्रश्न उपस्थित होतोच. याचं उत्तर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं (Serum Institute of India) दिली आहे. पुढील वर्षात जानेवारी महिन्यातच कोरोना लस उपलब्ध होईल, असं सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी सांगितलं की जानेवारी 2021 पर्यंत कोरोनाची लस (Covid-19 vaccine) येऊ शकते. या लशीची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी असेल असंदेखील त्यांनी सांगितलं. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीची ही लस. ज्यामध्ये पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटचीही भागीदारी आहे. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंतच या लशीच्या तिसऱ्या ट्रायलचे परिणाम समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षात जानेवारी महिन्यातच ही लस दिली जाऊ शकते. याआधीदेखील अदार पूनावाला यांनी सीरम इन्स्टिट्युट लशीच्या आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज करू शकते, असं सांगितलं होतं. न्यूज 18 शी बोलताना अदारा पूनावला म्हणाले होते, आता सुरक्षेची काळजी करण्याची गरज नाही. मात्र लशीचा दीर्घकालीन प्रभाव समजण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील. ही लस स्वस्तात उपलब्ध करून दिली जाईल. लसीकरण कार्यक्रमातही या लशीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील. हेही वाचा...'या' कारणामुळे 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो राष्ट्रीय संविधान दिवस कोरोनाच्या स्पर्धेत ऑक्सफोर्डची कोरोना लस पुढे आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार जर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला तर ब्रिटनमध्ये डिसेंबर किंवा 2021 वर्षाच्या सुरुवातीलाच लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. जर सर्वकाही सुरळीत असेल तर भारतातही सर्वसामान्यांना लगेच ही लस उपलब्ध करून दिली जाईल.
Published by:Sandip Parolekar
First published: