• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • असा हा सुंदर 'प्लास्टिकचा’ बंगला! पुणेकराच्या अनोख्या बंगल्याची देशभर चर्चा

असा हा सुंदर 'प्लास्टिकचा’ बंगला! पुणेकराच्या अनोख्या बंगल्याची देशभर चर्चा

प्लास्टिकच्या तब्बल ६० हजारांपेक्षा जास्त बाटल्यांपासून दोन मजली घर साकारलंय. सिंहगड परिसरातलं हे घर सध्या चर्चेचा विषय बनलंय.

  • Share this:
पुणे, 05 फेब्रुवारी: प्लास्टिकच्या फेकलेल्या बॉटल ही एक वैश्विक समस्या बनलीय. पण या समस्येलाच कल्पकतेची जोड देत एका पुणेकरानं स्वप्नांचा इमला साकारलाय. प्लास्टिकच्या तब्बल ६० हजारांपेक्षा जास्त बाटल्यांपासून त्यांनी दोन मजली घर साकारलंय. सिंहगड परिसरातलं हे घर सध्या देशभर चर्चेचा विषय बनलंय. वास्तूविशारद राजेंद्र इनामदारांनी हे घर साकारलंय. प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या जगभर गंभीर रुप धारण करतीय. कारण प्लास्टिक कुजत नाही आणि नष्टही होत नाही. अशावेळी  इतर उपाय शोधणं गरजेचं आहे. त्यामुळेच कल्पकतेला पर्यावरण भानाची जोड देत इनामदार यांनी हजारो बाटल्यांचा पुनर्वापर करून घर बांधायचं ठरवलं. जवळपास तीन वर्ष त्यांनी बाटल्या गोळा केल्या. त्यात क्रश, वाळू, सिमेंट भरलं. खरंतर हे वेळ खाऊ काम होतं. पण इनामदार यांनी पेशन्स ढळू न देता बाटल्यांच्याच टणक विटा बनवल्या. या बाटल्यामुळे घराच्या मजबुतीला बाधा पोहोचेल का असा प्रश्न अनेकांना पडतो. पण या बाटल्यांनी घर अत्यंत मजबूत बनतं असं इनामदार सांगतात. खरंतर जगभर असे प्रयोग झालेत. पण भारतात असे प्रयोग फारसे झाले नव्हते. इनामदार यांनी धाडस केलं आणि घर बांधायचं ठरवलं. पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घर उभारल्यानं कचऱ्याचा पुनर्वापर झाला. प्रत्येकानं हा मार्ग अवलंबला तर प्रदूषण होणार नाही असं आवाहन इनामदार करतात. ताप, वेदना, मळमळ; महिलांनो लक्ष द्या, तुम्हाला असू शकतो ‘हा’ फ्लू बांधकामासाठी वापरली जाणारी बाटली भरण्यासाठी साडेतीन रूपये खर्च येतो. तर एका वीटेची किंमत सुमारे सात रूपये आहे. त्यामुळे खर्च तर वाचतोच शिवाय पर्यावरणाचंही रक्षण होतं. प्लास्टिकबंदी लागू झाली असली तरी त्याच्या अमलबजावणीचा प्रश्न आहेच. पण प्लास्टिकचा पुनर्रवापरही केला जात नसल्यानं प्लास्टिकचा कचरा एक गंभीर समस्या बनली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी अशा अनोख्या प्रयोगांची गरज आहे. सरकारकडूनही प्लास्टिकचा वापर करून रस्ते निर्मितीचा प्रयोग काही ठिकाणी केला जातोय. पण त्याचं प्रमाण अजूनही तोकडं आहे. सरकारी आणि खासगी प्रयत्नच आपल्याला प्लास्टिकमुक्तीकडे नेवू शकतात. इनामदार याचे इमानदार प्रयत्न त्यादृष्टीनं टाकलेलं महत्वाचं पाऊल ठरू शकतं. रानू मंडल यांचं हिमेश रेशमियासोबत नवं गाणं रिलीज, पाहा VIDEO
Published by:Manoj Khandekar
First published: