सातारा, 25 एप्रिल: पुणे जिल्ह्यातून (Pune News) एक खळबळजनक बातमी समोर येते आहे. जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडवकण्याचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे एका तरुणीने या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोघांचा तर साताऱ्यातील एकाचा समावेश आहे. धक्काादायक म्हणजे यामध्ये आरोपी असलेली एक व्यक्ती राष्ट्रवादीचा युवा नेता आणि मोहिते यांचा एक निकटवर्तीय आहे.
शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहुल किसन कांडगे (रा.चाकण, जि.पुणे) , सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयुर साहेबराव मोहिते-पाटील यांनी फिर्याद दिली आहे. मात्र शैलेश मोहिते हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा राष्ट्रीय सरचिटणीस असून आमदारांचा निकटवर्तीय असल्याने असल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात अशी माहिती समोर आली आहे की, या संशयितांनी साताऱ्यातील एका युवतीच्या मदतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याची योजना आखली होती. बदनामीची भीती घालत त्यांच्याकडून लाखो रुपये गोळा करण्याचा त्यांचा डाव होता. त्या बदल्यात यायुवतीला काही रक्कम या प्रकरणातील संशयित आरोपींनी दिली होती. मात्र, त्या युवतीनेच संशयितांचा भांडाफोड करून हे प्रकरण उघडकीस आणले.
(हे वाचा-पुणेकरांना दिलासा! एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या 4 हजारांखाली)
साताऱ्यातील त्या युवतीने मयुर मोहिते यांना फोन करून या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने सातारा पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला. त्या युवतीने चौकशीत दिलेली माहिती अशी की, साताऱ्यात राहणारा सोमनाथ शेडगे हा तिचा मित्र असून त्याच्या ओळखीने शैलेश मोहिते आणि राहुल कांडगे हे दोघेजण 12 एप्रिलला तिला भेटण्यासाठी साताऱ्यात आले होते. त्यांनी तिला आपल्याला आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले.
(हे वाचा-“कंगनाचं डोकं ठिकाणावर आहे का?”; पाकिस्तानची स्तुती केल्यामुळं भडकले भारतीय)
तरुणीने अशी माहिती दिली आहे की, असे कृत्य करण्याच्या बदल्यात तिला काही रोख रक्कम आणि पुण्यात एक फ्लॅट देण्याचे कबुल केले. त्यासाठी तिला नोकरीच्य बहाण्याने आमदारांकडे जाण्यास सांगितले आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांची बदनामी करण्याची योजना होती, अशी माहिती त्या तरुणीने दिली आहे. या बदल्यात तिला एकूण 90 हजार रूपये देण्यात आले. मात्र, हा सगळा प्रकार मनाला न पटल्याने तिने आमदारांचे पुतणे आणि तक्रारदार असणाऱ्या मयुर यांना फोन केल्याची माहिती या तरुणीने दिली आहे. या प्रकरणात संशयाची सुई आमदारांच्या निकटवर्तीयाकडे असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली . त्यांनी तत्काळ संबंधित युवतीकडे कसून चौकशी करून यातील काही महत्त्वाचे पुरावे हाती घेतले . त्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला.याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नाही .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune (City/Town/Village), Satara