मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune News: पुण्यात मिळतोय चक्क गुलाबी चहा! आरोग्यालाही आहे फायदा, Video

Pune News: पुण्यात मिळतोय चक्क गुलाबी चहा! आरोग्यालाही आहे फायदा, Video

X
अमृततुल्यसाठी

अमृततुल्यसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात आता चक्क गुलाबी रंगाचा चहा मिळतोय. कसा तयार करतात हा चहा पाहूया

अमृततुल्यसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात आता चक्क गुलाबी रंगाचा चहा मिळतोय. कसा तयार करतात हा चहा पाहूया

  नीलम कराळे, प्रतिनिधी

  पुणे, 16 मार्च : सकाळी उठल्यावर वाफाळलेला चहा प्यायला अनेकांना आवडतं. चहाच्या प्रकारामध्येही प्रत्येकाची आवड असते. काहींना कोरा चहा आवडतो तर काहींना आलं टाकलेला तर काहींना वेलचीचा चहा आवडतो. पुणे शहरातही चहाचे अनेक दुकानं प्रसिद्ध आहेत. अमृततुल्यसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात आता चक्क गुलाबी रंगाचा चहा मिळतोय. कसा आहे हा चहा पाहूया

  कशी सुचली कल्पना?

  पुण्यातील नवी पेठ येथे विठ्ठल मंदिराजवळ दर्जेदार नावाचे एक छोटेसे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये  गुलाबी चहा मिळतो. अनिकेत वरकडे आणि त्याच्या मित्राने हे रेस्टॉरंट सुरू केले. आपली वेगळं वैशिष्ट्य असावे म्हणून त्यांनी हा चहा सुरू केला. अनिकेतच्या नातेवाईकांनी काश्मिरमधून कावा आणला होता. तो त्याला कडवट लागला. त्यावर उपाय म्हणून त्यानं वेगवेगळे व्हिडीओ YouTube वर पाहिले. त्या संशोधनातून त्यांनी हा चहा बनवला आहे.

  कोल्हापूरचा बासुंदी चहा एकदा पिऊन तर पहा! रात्री देखील असते मोठी गर्दी, Video

   या चहाची किंमत जास्त आहे. तो सर्वसामान्यांना परवडावा यासाठी चहामध्ये वेगवेगळ्या रेसिपीच ट्राय करुन सध्याचा चहा पुणेकरांसाठी केला आहे. या चहामध्ये घट्ट दूध, ड्रायफूड, काश्मिरी कावा असतो. तसंच अनिकेत आणि त्याच्या कुकनं बनवलेले वेगवेगळे मसालेही वापरले जातात. या चहामध्ये संपूर्ण नैसर्गिक गोष्टी वापरल्या असून त्यामुळे पित्त होत नाही, असा दावा अनिकेतनं केला. या चहाची किंमत 35 रुपये असल्याची माहिती त्यानं दिली.

  'मी सोशल मीडियावर या चहाचा व्हिडीओ पाहिला. त्यानंतर पहिल्यांदा हॉटेलचा शोध घेत इथं आलो. मला हा चहा खूप आवडला. त्यानंतर  मित्र-मैत्रिणींनाही हा चहा पिण्यासाठी आणले होते. हा चहा फक्त रंगानं नाही तर चवीनंही दर्जेदार आहे, अशी प्रतिक्रिया येथील ग्राहक जयराज गौड यांनी दिली.

  गूगल मॅपवरून साभार

  First published:

  Tags: Local18, Pune, Tea