— News18Lokmat (@News18lokmat) September 18, 2021पुणेकरांनो लक्ष द्या; 'या' दिवशी पुणे शहर बंद राहणार 13 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास इंद्रायणीनगर भोसरी येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, चालक म्हणून काम करणारा विनोद भस्के याने कामावरुन काढल्याचा राग मनात धरला. त्यानंतर त्याचा भाऊ अंकित भस्के याच्यासोबत मिळून माझ्या 22 लाख रुपये किमतीच्या गाडीवर स्फोटक द्रव्य टाकून आग लावून नुकसान केले. भोसरी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विनोद किसनराव भस्के आणि अंकित भस्के या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. दोन्ही आरोपी हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात छमछम जोरात सुरू; पोलिसांनी छापा टाकत 10 महिलांसह 31 जणांना केली अटक लुटमार आणि दरोडा टाकणारी टोळी अटकेत गावठी पिस्तूल आणि तलवारचा धाक दाखवून लुटमार आणि दरोडा टाकणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची ही एक मोठी कारवाई आहे. पुणे सातारा महामार्गावरील वरवे गावातील भंगार व्यावसायिक कुरबान इन्सान अली यांच्या घरावर दरोडा टाकून लूटमार करून ही टोळी पळाली होते. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी काही तासात गुन्हेगारांना मुद्देमालासह चार जणांना पकडले आहे. साफळा रचून या टोळीला अटक करण्यात आली आहे. जबरी दरोड्यातील फरार आरोपी 41 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात अंकुश माणिक गायकवाड असं अटक केलेल्या 58 वर्षीय आरोपीचं नाव असून तो सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील खडकी येथील रहिवासी आहे. आरोपी गायकवाडने आपल्या अन्य आठ साथीदारांच्या मदतीनं दौंडजवळील यवत येथे जबरी दरोडा टाकला होता. हा गुन्ह केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. पण यातील सहा आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. पण आरोपी गायकवाडसह तिघेजण मागील 41 वर्षांपासून फरार होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.